घरमनोरंजन‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कमाई करत आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित होऊन 8 दिवस पूर्ण झाले असून 8 दिवसात या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ने 8 व्या दिवशी कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचे दिसत होते. पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी देखील 10 कोटींची कमाई केली. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.52 कोटींची कमाई केली होती तसेच प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 16.57 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने 17.08 कोटी कमावले होते. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 6 कोटींचा टप्पा पार केला तर सातव्या दिवशी या 6.02 कोटी कमावले असून आठव्या दिवशी 5.70 कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंच या चित्रपटाने 87.91 कोटी कमावले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मोठ्या पडद्यावर होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.

 

- Advertisement -

हेही वाचा :

जनाची नाही तर मनाची…. तू मलायका नाहीस; उर्वशी ढोलकियाच्या ‘या’ फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -