घरताज्या घडामोडीलवकरच उज्जवल 'निकम' यांची बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस

लवकरच उज्जवल ‘निकम’ यांची बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक तयार करण्यात येत आहे. ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटाचे निर्माते उमेश शुक्ला हे निकम यांच्यावर बायोपिक तयार करत असून त्यांच्यावर आधारित असलेल्या बायोपिकचे नाव ‘निकम’ असे असणार आहे. ‘ओएमजी- ओह माय गॉड’चे लोकप्रिय उमेश या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून सेजल शाह, आशीष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडालिया हे या बायोपिकेची निर्मिती करणार आहेत.

काय असणार या बायोपिकची कथा?

सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये अशा कथा दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये उज्जव निकम यांनी त्यांच्या हातखंड्यामुळे अनेक निरपराधांना न्याय मिळाला असून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा झाली आहे. वकिल निकम यांची कामकाजाची पद्धत अशा सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे. या बायोपिकचे लेखन अवॉर्ड विजेता लेखक भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत.

- Advertisement -

आम्ही अशा व्यक्तीवर आधारित बायोपिक करत आहोत. ज्या व्यक्तीचा भावनांवर नाहीतर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. ‘निकम’ हे एक खरे हिरो असून ते अन्याया विरोधात लढणारे वकिल आहेत.  – उमेश शुक्ला; निकम बायोपिकचे निर्माते


हेही वाचा – युवासेनेच्या कार्यक्रमात मानसी नाईकसोबत छेडछाड; गुन्हा दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -