घरट्रेंडिंगतुम्हाला माहितेय का 'महाभारत' च्या शुटींगदरम्यान काय घडले? तर मग हे वाचा!

तुम्हाला माहितेय का ‘महाभारत’ च्या शुटींगदरम्यान काय घडले? तर मग हे वाचा!

Subscribe

महाभारताच्या चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं हे सांगतायत महाभारतात युधिष्ठिरची भुमिका करणारे अभिनेता गजेंद्र चौहान.

लॉकडाऊनमध्ये खास लोकांच्या अग्रहाखातर दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या ९०च्या दशकातील मालिका पुन्हा दाखवायला सुरूवात केली. दोन्ही मालिकांमुळे प्रेक्षक पुन्हा भुतकाळात रमले. पण महाभारताच्या चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे. नेमकं त्यावेळी काय घडलं हे सांगतायत महाभारतात युधिष्ठिरची भुमिका करणारे अभिनेता गजेंद्र चौहान.

- Advertisement -

गजेंद्र चौहान म्हणतात, महाभारतावर सगळेच प्रेक्षक खूप प्रेम करत होते. जयपूरमध्ये महाङारताचे शुटींग सुरू होते. यावेळी लोकांची गर्दी व्हायची. त्यामुळे गर्दीला थांबवण्यासाठी ४०० पोलिसांना ड्यूटी लावण्यात आली होती. गमतीची गोष्ट म्हणजे ड्युटीवर असणारे पोलिसही आपल्या कुटुंबाबरोबर शुटींग बघत उभे रहायचे. संपूर्ण शुटींग हे शांततेत पार पडले. एवढ्या मोठ्या शुटींग दरम्यान कोणताच अपघात घडला नाही. शुटींगमध्ये रथ, हात्ती, घोडा यांच्याबरोबर अनेक हत्यारं देखील होती. मात्र साझी जखम सुद्ध कोणाला झाली नाही.

यापुढे आपल्या भुमिकेविषयी बोलताना गजेंद्र म्हणाले, कोणत्याही भुमिकेचा तुमच्या जीवनावर आयुष्यभऱ परिणाम होत नाहीत. कारण पुढे जाऊन अनेक भुमिका आम्हाला करायच्या असतात. पण माझ्यात असलेले संस्कार हे मला खूप लहानपणापासून घरातून मिळाले होते. उदा. कधी खोटं बोलायचं नाही, पान खायचं नाही, सिगरेट ओढायची नाही.

- Advertisement -

पुन्हा महाभारत बनणार का यावर गजेंद्र म्हणाले, महाभारत पुन्हा होऊ शकतं. पण सगळ्यात मोठी अडचण आहे की महाभारत लिहीणार कोण? कारण डॉक्टर राही मासूम रजा साहेब यांनी महाभारत लिहिलं होतं. पुन्हा साहेबांना कोण आणणार त्याचबरोबर ती टीम अशी होती की जस काही देवानेच ही टीम बनवली होती. कारण ज्यांनी जी भुमिका मिळाली ती त्याने मनापासून केली.


हे ही वाचा – Lockdown- विद्यार्थ्यांनो आता घर बसल्या द्या परीक्षा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -