घरमहाराष्ट्रनाशिकसातपूर लिंक रोडवरील ५०० मीटर परिसर सील

सातपूर लिंक रोडवरील ५०० मीटर परिसर सील

Subscribe

महापालिकेने सुरु केली संजीव नगरमधील नागरिकांची आरोग्य तपासणी

नाशिक- शहरात आणखी दोन करोनाबाधित आढळल्याने महापालिकाही अधिक सतर्क झाली आहे. गुरुवारी (दि. १६) सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीव नगर परिसरातील पाचशे मीटरपर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेण्यात आली.
काही दिवसांपूर्वी शहरात गोविंदनगर जवळील मनोहरनगर, नवशा गणपती मंदिर आणि नाशिकरोड परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापाठोपाठ समाजकल्याण वसतीगृहातील निवारागृहात मुंबईहून आश्रयास थांबलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पौर्णिमा चौक, व्दारका आणि काठेगल्ली हा परिसर सील करण्यात आला आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. १६) सातपूर-अंबड लिंकरोड तसेच एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्णाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील रुग्णालयात आढळून आलेला रुग्ण हा मालेगावमधून एन्जोप्लास्टीसाठी नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील रुग्णालयात दाखल होता. सातपूर-अंबड लिंकरोडवरील ६३ वर्षीय महिलेचा मुलगा पुण्याहून नाशिकला आला होता. तो करोना निगेटिव्ह असला तरीही त्याच्या माध्यमातून करोनाचा विषाणूची बाधा त्याच्या आईला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णामुळे सातपूर-अंबड लिंकरोडवरील प्लॉट क्रमांक ४२, संजीवनगर, दक्षिणमुखी मारुती मंदिर या परिसरातील ५०० मीटर क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाही. तसेच बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

सातपूर लिंक रोडवरील ५०० मीटर परिसर सील
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -