घरमनोरंजनIWM BUZZ Award 2023 मध्ये उर्वशी रौतेलाने पटकावला सर्वात पात्र बॅचलरेटचा पुरस्कार

IWM BUZZ Award 2023 मध्ये उर्वशी रौतेलाने पटकावला सर्वात पात्र बॅचलरेटचा पुरस्कार

Subscribe

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. उर्वशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकताच उर्वशीने IWM BUZZ Award 2023 मध्ये एक अवॉर्ड जिंकला आहे. हा अवॉर्ड जिंकल्यामुळे उर्वशी जगातील सर्वात पात्र असलेली बॅचलरेट झाली आहे. उर्वशीने नुकतेच काही फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

IWM BUZZ पुरस्कार 2023 ने अभिनेत्रीला जागतिक स्तरावर मोस्ट एलिजिबल बॅचलोरेटची पदवी दिली आहे. तिच्या सौंदर्यामुळे उर्वशी या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. दरम्यान, हा पुरस्कार मिळाल्यानंतर उर्वशीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यावेळी अनेकांनी क्रिकेटपटू ऋषभ पंतची आठवण काढू लागेल. दरम्यान, IWM BUZZ Award 2023 अवॉर्ड शोमध्ये उर्वशी अतिशय अनोख्या लूकमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने पिवळा आणि हिरवा बटरफ्लाय ड्रेस परिधान केला होता.

- Advertisement -

2015 मध्ये पटाकवला होता मिस इंडियाचा किताब

उर्वशीने 2015 मध्ये मिस इंडिया हा किताब जिंकला होता. तेव्हापासून उर्वशीला मॉडलिंग क्षेत्रात ओळख मिळाली. आजही विविध देशांतील फॅशन शोमध्ये उर्वशी सहभागी होताना दिसते. नुकतीच उर्वशी ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरीजमध्ये देखील दिसली होती.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘सत्यप्रेम की कथा’ मधील ‘सुन सजनी’ गाणे प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -