घरमनोरंजन'युअर मुव्ही इज युअर मुव्ही, नन ऑफ अवर मुव्ही', वरूण झाला ट्रोल!

‘युअर मुव्ही इज युअर मुव्ही, नन ऑफ अवर मुव्ही’, वरूण झाला ट्रोल!

Subscribe

 

‘रेस ३’ चा ट्रेलर आल्यापासून या चित्रपटाचीच चर्चा आहे. तर त्यातील अभिनेत्री डेझी शहाच्या तोंडी असलेल्या ‘अवर बिझनेस इज अवर बिझनेस, इट्स नन ऑफ युअर बिझनेस’ हा डायलॉग खूपच ट्रोल होत आहे. याचे मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. बॉलीवूडमधील काही स्टार्सदेखील हा डायलॉग आपल्या स्टाईलमध्ये बोलून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहेत. आघाडीचा स्टार वरूण धवननेदेखील हा डायलॉग आपल्या स्टाईलने म्हटला आणि नेटीझन्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

- Advertisement -

वरूणची स्टाईल आणि ट्रोलर्सची स्माईल!

‘रेस ३’चा दिग्दर्शक रेमो डिसुझाबरोबर वरूण काहीतरी बोलत उभा असताना त्याला विचारण्यात येतं की तुम्ही काय चर्चा करत आहात? त्यावर ‘अवर बिझनेस इज अवर बिझनेस, इट्स नन ऑफ युअर बिझनेस’ असं म्हणून वरूण कॅमेरा बाजूला करतो. ही मजा इन्स्टावर पोस्ट केल्यानंतर वरूण आणि रेमोच्या चाहत्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरवात केली.

- Advertisement -

वरूण..तुम्ही जोकर दिसताय!

वरूणने हा डायलॉग म्हटल्यानंतर ‘युअर मुव्ही इज युअर मुव्ही नन ऑफ अवर मुव्ही’ अशा तऱ्हेने ट्रोल करण्यात आले. तर ‘तुम्ही हा डायलॉग म्हणून जोकर दिसत आहात’ असेही ट्रोल करण्यात आले आहे. एका चाहत्याने तर असे म्हटले की, ‘वरूण धवनदेखील आता या डायलॉगची इज्जत जाण्यापासून वाचवू शकत नाही’!

ट्रेलरपेक्षा डायलॉग जड!

चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून ट्रेलरपेक्षा या डायलॉगचीच चर्चा जास्त आहे. काही लोकांना हा डायलॉग आवडला, तर बऱ्याच लोकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातील घटनांना जोडत या डायलॉगचा वापर करायला सुरुवात केली आहे.

#noneofyourbusiness @varundvn #race3

A post shared by Remo Dsouza (@remodsouza) on

 

वरूण धवन आणि रेमो डिसुझा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -