घरमनोरंजन'काला'च्या पोस्टरमधली हुमा सर्वांनाच भावली!

‘काला’च्या पोस्टरमधली हुमा सर्वांनाच भावली!

Subscribe

सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित ‘काला’ चित्रपट प्रदर्शित व्हायला काही दिवस शिल्लक असताना या चित्रपटाचे पोस्टर चित्रपटातील कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये हुमा कुरेशीचा चित्रपटातील लुक पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आला आहे. या चित्रपटामध्ये हुमा एका ४५ वर्षीय महिलेच्या रोलमध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर मध्ये हुमा मनमोहक दिसते आहे. टॉलीवुड मधील तिचे हे पहिले पाऊल असल्यामुळे तिच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.

हुमाने तिच्या इंन्स्टाग्राम आकांऊटवर चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हुमाने चित्रपटात काम करायला मिळाल्याबद्दल रजनीकांतचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

कशी असेल हुमाची भूमिका?
चित्रपटाच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट पोस्टरमध्ये हुमा अतिशय सुंदर दिसते आहे. तिने या चित्रपटात ४५ वर्षीय झरीन या महिलेची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि इस्वरी राव या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात इस्वरी राव रजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. कबालीनंतर रजनीकांतचा हा पहिलाच चित्रपट आहे.

- Advertisement -

राजकीय प्रवेशानंतर पहिलाच सिनेमा
राजकारणात प्रवेश केल्यानंतर पडद्यावरचा रजनीकांत आता काय कमाल दाखवतो याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळ या चित्रपटासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

मुंबईच्या धारावीत झालं शुटिंग
हा राजकीय नाट्यपट असून या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईतील धारवीमध्ये झालं आहे. हा चित्रपट २ तास ४६ मिनिटांचा असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी एक वेगळीच उत्सुकता आहे. हा चित्रपट रजनीकांतचा जावई आणि कोलावरी डी फेम अभिनेता धनुषने प्रोड्युस केला असून पी. रणजीत यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ७ जूनला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -