घरमनोरंजनकास्टिंग काऊचविषयी विद्या बालनने केला मोठा खुलासा

कास्टिंग काऊचविषयी विद्या बालनने केला मोठा खुलासा

Subscribe

'दिग्दर्शक मला एकटीला रूममध्ये घेऊन गेला आणि...'

बॉलिवूड क्षेत्रातील अभिनेत्री विद्या बालन कोणत्याही विषयावर मोकळेपणा बोलत असते. नुकताच, विद्या बालनने आपल्या आयुष्याशी संबधित एक मोठा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा आहे कास्टिंग काऊच.

यावेळी, अभिनेत्री विद्या बालनने सांगितले की, कशाप्रकारे एक चांगली अभिनेत्री बनण्यासाठी स्ट्रगल करावा लागला होता. यासोबतच विद्याने कास्टिंग काऊचविषयी बोलताना सांगितले, ‘चेन्नईमध्ये कामानिमित्त एका दिगदर्शकाला भेटण्यास गेले होते. त्यावेळी मला विचित्र अनुभव आला.’ विद्या बालनकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. काही चित्रपटांच्या चित्रीकरणालाही तिने सुरुवात केली होती. मात्र एक दिवस एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला चित्रपटाबद्दल बोलायचे आहे, असे सांगून बोलावले. विद्याने कॉफी शॉपमध्ये जाण्याबद्दल सांगितले असता त्या दिग्दर्शकाने तिला सतत रूमवर येण्याचा आग्रह केला.

- Advertisement -

दिग्दर्शकाच्या वागण्यावरून त्याच्या मनात नेमके काय चालले याचा अंदाज आला. त्यावरून त्याला चांगली अद्दल घडविण्याचे ठरविले. ती दिग्दर्शकासोबत रूममध्ये गेली. मात्र रूममध्ये जाताना तिने दरवाजा उघडा ठेवला. रूममध्ये गेल्यानंतर काही वेळ दिग्दर्शकाने सर्वसामान्य गोष्टींवर चर्चा केली. मात्र वेळ, विद्याची बोलण्याची पद्धत, विद्याचे हावभाव आणि उघडा दरवाजा पाहून तो स्वतः रूमच्या बाहेर गेला. विद्याच्या अशा वागण्यामुळे तिच्या हातून तो चित्रपट गेला. अशाच प्रकारच्या अनेक घटना तिच्यासोबत घडल्या. विद्याच्या हातात तेव्हा साधारण १० चित्रपट होते. मात्र अर्ध्याहून जास्त चित्रपटातून तिला काढण्यात आलं.

- Advertisement -

याप्रसंगानंतर विद्याने सांगितले की, या घटनेला आजही विसरू शकत नाही. तसेच अशाप्रकारच्या अनेक घटनांना सामोरे गेली आहे. त्यामुळे मी काहीकाळ भेदरलेलीच होती. यासारख्या प्रसंगातून बाहेर पडणं कठीण होतं. यापुर्वी विद्या बालनने अनेकदा बॉलिवूडमधील चित्रपटांतून रिजेक्शनवर चर्चा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -