घरमहाराष्ट्रबिकिनीवर शूट करण्यास सांगणारा मराठी अभिनेता अटकेत

बिकिनीवर शूट करण्यास सांगणारा मराठी अभिनेता अटकेत

Subscribe

बिकिनीवर शूट करण्यास सांगणारा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता मंदार संजय कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे.

फोटोशूटच्या नावाखाली बिकिनीवर शूट करण्यास सांगणारा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता मंदार संजय कुलकर्णीला अटक करण्यात आली आहे. एका १७ वर्षाच्या तरुणीचं फोटोशूट करण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपीने फोटो शूट करण्यासाठी तरुणीला आपल्या घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना १६ ऑगस्ट रोजी घडल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंदार कुलकर्णीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -


नेमकं काय घडलं
?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित तरुणी आधीपासूनच एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंदार याने तुरुणीला असं सांगितलं की, मी चित्रपट आणि टीव्ही सीरियला लागणाऱ्या अभिनयासाठी तरुणतरुणींची शिफारस करतो. तू ही ट्राय कर‘, असं सांगत मंदारने तरुणीला ऑडिशनसाठी आपल्या घरी बोलावलं होतं. त्याप्रमाणे तरुणी १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता मंदारच्या घरी गेली होती. मंदारने तिला फोटो शूट करायचे आहे, असं सांगून तिला बिकनी परिधान करायला दिली. त्यानंतर त्या तरुणीचे पाठीचे फोटो मोबाइल कॅमेऱ्यात कैद करुन घेतले आणि ते तिला दाखवले. त्यानंतर कपड्यांचे माप घेण्यासाठी अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. मनात लज्जा निर्माण होईल, असं कृत्य मंदारने त्या तरुणीसोबत केलं. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंदार कुलकर्णी (२४) याच्यावर पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून मंदारला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -