घरमहाराष्ट्रसोलापूर येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सोलापूर येथे भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Subscribe

सोलापूर मधील दक्षिण भागातील चिंचपूर येथे सोलापूर मधील दक्षिण भागातील चिंचपूर येथे पहाटे भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर मधील दक्षिण भागातील चिंचपूर येथे मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे झाला आहे.

- Advertisement -

चडचणे कुटुंबियांवर काळाचा घाला

श्रावणनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चडचणे कुटुंबिय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते. या कुटुंबाचे देवदर्शन झाल्यानंतर ते सोमवारी मूळगावी परत येत होते. मूळगावी परतत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद आळंदी येथे हा अपघात झाला. या अपघातात जागीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर याठिकाणाची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच आळंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळता चिंचपूर गावावर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -