घरमनोरंजनViral Video : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणने फेकला चाहत्याचा फोन; ट्रोलर्स संतापले

Viral Video : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणने फेकला चाहत्याचा फोन; ट्रोलर्स संतापले

Subscribe

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आदित्य नारायण सध्या एका व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्मन्स करताना दिसत आहे. दरम्यान, सुरु असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यने अचानक स्टेज खाली उभ्या असलेल्या एका चाहत्यासोबत असं काही केलं, जे पाहून सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

आदित्य नारायणने फेकला चाहत्याचा फोन

रायपूरमध्ये एका ठिकाणी गायक आदित्य नारायणचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी आदित्य त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स करताना दिसला. यावेळी आदित्यला लाईव्ह ऐकण्यासाठी अनेक चाहते त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी अचानक आदित्यने एका चाहत्याला हातातल्या माईकने मारलं आणि रागारागात चाहत्याचा फोन फेकला. आदित्यचा हे विचित्र वागणं पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत.

- Advertisement -

आदित्य ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आदित्य नारायणचा हा व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. त्याच्या या कृतीवर सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिलंय की, “म्हणून या लोकप्रिय गायक कधीच होऊ शकला नाही.” तर दुसऱ्याने लिहिलंय, “हा पण याच्या बापासारखाचं घमंडी आहे.” तर एकाने लिहिलंय की, “अरिजित सिंहकडून शिक काहीतरी”

दरम्यान, याआधी देखील आदित्य नारायणच्या गैरवर्तनाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. वर्षभरापूर्वी रायपूर विमानतळावर तपासणीदरम्यान त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले होते. यावेळीही सोशल मीडियावर आदित्य नारायणच्या विरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला होता.


हेही वाचा : किरण रावचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली तर मी डिप्रेशनमध्ये…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -