घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरUddhav Thackeray : भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधीलच; ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधीलच; ठाकरेंचं मोठं विधान

Subscribe

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर आज सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, गंगापूर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोनगावकर उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकण्यात आले आहे. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला तसेच भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल असे भाकीत केले त्यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये बोलत होते. (Uddhav Thackeray BJP president in future also in Congress Thackerays big statement)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने गंगापूर येथील पंचायत समिती मैदानावर आज सोमवार (12 फेब्रुवारी) जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, गंगापूर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोनगावकर उपस्थित होते.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अशोक चव्हाण यांचं मला आश्चर्य वाटतं. कालपर्यंत जागावाटपामध्ये भाग घेत होते. पण आज असं अचानक काय घडलं? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मला असं वाटतं की, त्यांना राज्सभेची जागा देत आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापलं बघतो आहे. मग माझ्या शेतकऱ्यांचं दु:ख आहे, ते कोण पाहणार? स्वत: घर, माझं करिअर, उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, तर मी पुढची सहा वर्ष मस्त राहीन. पण शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे जाऊन बघा, तो तुम्हाला काय शिव्या देत आहेत. असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : Nikhil Wagle : निखिळ वागळेंच्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

- Advertisement -

हिम्मत असेल तर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी जाहीर करा

या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाहीत,शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहेत मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी असे आव्हान ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला दिले.

हेही वाचा : Varsha Gaikwad: मोदी-शहांच्या सत्तेने राजकारणाचे बाजारीकरण; वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

तुम्ही चाळीस पारही करणार नाही

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबांचं कल्याण होत नाही. तर त्यांचं कुटुंब उघड्यावर पडतं. त्या शेतकऱ्याचे आई-वडील, बहीण-भाऊ, पत्नी आणि मुल-बाळं उघड्यावर पडतात. ही उघड्यावर पडलेली कुटुंब तुम्हाला उद्या जाब विचारणार आहेत. आता म्हणातयेतात की 400 पार, चारशेपार सोडा, तुम्ही 40 पारही करणार नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -