घरताज्या घडामोडीNetflix Releases In March 2022 : मार्च महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार 'या'...

Netflix Releases In March 2022 : मार्च महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार ‘या’ वेब सिरीज अन् सिनेमे

Subscribe

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे. नेटफ्लिक्स हा ओटीट प्लॅटफॉर्म  सध्या सर्वाधिक पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. आपल्या जॉनरनुसार कटेंट इथे उपलब्ध असतो. ज्यात एक्शन, रोमान्स, हॉरर आणि थ्रीलर सिनेमे आणि वेब सिरीजचा समावेश असतो

NetFlix Releases In March 2022 : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा जमाना आहे. नेटफ्लिक्स हा ओटीट प्लॅटफॉर्म  सध्या सर्वाधिक पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. आपल्या जॉनरनुसार कटेंट इथे उपलब्ध असतो. ज्यात एक्शन, रोमान्स, हॉरर आणि थ्रीलर सिनेमे आणि वेब सिरीजचा समावेश असतो. नेटफ्लिक्सवर मार्च महिन्यात रिलीज होणारे सिनेमे आणि वेब सिरीज कोणत्या आहेत पाहूयात.

इटरनली कन्फ्यूज एँड इगल फॉर लव्ह (Eternally Confused and Eager for Love)

- Advertisement -


इटरनली कन्फ्यूज एँड इगल फॉर लव्ह ही वेब सिरीज एका २४ वर्षांच्या गोंधळलेल्या मुलाची आहे जो प्रेम मिळवण्यासाठी चुकीच्या वळणावर जातो. झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शन हाऊनसने नेटफ्लिक्सवर ही सिरीज आणली आहे.

द एडम प्रोजेक्ट

- Advertisement -


द एडम प्रोजेक्ट हा सिनेमा ११ मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा हॉलिवूड सिनेमा असून जबरदस्त अँक्शनने भरलेला आहे.

अगेंस्ट द आइस

अगेंस्ट द आइस हा सिनेमा २ मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. १९९० च्या डेनमार्कवर हा सिनेमा आधारित आहे. ग्रीनलँडच्या जमिनीचे दोन तुकडे झाले ती कहाणी दाखवण्यात येणार आहे.

पायरेट्स: द लास्ट रॉयल ट्रेझर

पायरेट्स: द लास्ट रॉयल ट्रेझर हा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय परवाना असलेल्या पायरेट अँक्शन अडव्हेंचर सिनेमा आहे.

वर्स्ट रुममेट एव्हर ( Worst Roommate Ever) 

वर्स्ट रुममेट एव्हर ही वेब सिरिज आज रिलीज झाली आहे. एका भयानक सत्य घटनेवर आधारित ही वेब सिरीज आहे. पाच लोकांची कहाणी या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

नेटफ्लिक्सप्रमाणे अँमेझॉनवरही दमदार सिनेमे आणि वेब सिरीज रिलीज होणार आहेत. त्या कोणत्या आहेत जाणून घ्या.

जलसा

विद्याबालचा जलसा हा सिनेमा १८ मार्चला अँमेझॉनवर रिलीज होणार आहे. विद्या बालन आणि शेफाली शाह यात मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहेत. एक थ्रिलर ड्रामा सिनेमात पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – Mahashivratri Songs : ‘नमो नमो’ ते ‘शिवाय’ महाशिवरात्री करा बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांनी आणखी खास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -