घरताज्या घडामोडीVolodymyr Zelensky Wife: युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मनोबल अन् साहस वाढवणारा फॅक्टर ठरतेय पत्नी

Volodymyr Zelensky Wife: युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मनोबल अन् साहस वाढवणारा फॅक्टर ठरतेय पत्नी

Subscribe

रशिया-युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन युद्धावर आहे. रशिया एक शक्तीशाली देश आहे, तर युक्रेन सैन्याच्या ताकदीत कमी आहे. असे असूनही युक्रेनचे सैन्य आणि नागरिक आपल्या देशासाठी हिमतीने युद्ध लढत आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्की सतत सैन्य आणि नागरिकांना युद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. ते स्वतः या युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. ‘आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आम्हाला कोणी तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत आणि आम्ही युक्रेनियन आहोत. आम्ही आपल्या जमिनीसाठी लढत राहू,’ असे झेलेंस्की युरोपियन संसदेत म्हणाले. झेलेंस्की यांची हिंमत पाहून आज संपूर्ण जग त्यांचे कौतुक करत आहे. अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रपती झेलेंस्की यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी ओलेना खंबीरपणे उभ्या राहून त्यांचे मनोबल वाढवत आहेत. असे म्हटले जाते की, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ही गोष्टी पुन्हा एकदा खरी ठरली आहे. युक्रेनच्या या पहिल्या महिला नागरिक ओलेना कोण आहेत? वाचा

४४ वर्षीय ओलेना या कठीण परिस्थितीत आपल्या पतीसोबत खंबीरपणे उभ्या आहेत. विशेषमध्ये झेलेंस्की आणि ओलेना यांनी एकत्र शिक्षण घेतले आहे आणि आताही युद्धाला एकत्र सामोर जात आहेत. राष्ट्रपती झेलेंस्की राजकारणात सक्रीय आहेत, तर ओलेना समाजसेवा करतात.

- Advertisement -

झेलेंस्की होते कॉमेडियन

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की पहिल्यांदा कॉमेडियन होते. झेलेंस्की यांच्या कॉमेडीची पटकथा त्यांची पत्नी ओलेना लिहीत असे. ओलेना यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे. परंतु त्यांचा कल लेखनाकडे वळला.

झेलेंस्की यांच्या पत्नी गरिबांनासाठी करतात काम

कॉमेडियनपासून ते राष्ट्रपती बनण्याच्या प्रवासात ओलेना यांनी झेलेंस्की यांना नेहमी साथ दिली आहे. परंतु त्या जगासमोर कधी आल्या नव्हत्या. पण आता युद्धाच्या दरम्यान संपूर्ण जग त्यांना ओळखत आहे. झेलेंस्की आणि ओलेना यांना दोन मुलं आहेत. ओलेना या गरीब लोकांसाठी आणि महिलांसाठी काम करतात.

- Advertisement -

घाबरू नका, हिंमतीने लढाई लढा – झेलेंस्की यांच्या पत्नी 

आपल्या पतीप्रमाणे ओलेना आपल्या देशावर खूप प्रेम करतात. ओलेना यांना युक्रेनियन फॅशनला प्रोत्साहन देण्यासाठी फॅशन मॅगझीन वोगने आपल्या कव्हर पेजवर जागा दिली होती. आज युक्रेनवर कठीण काळ आला आहे, तर अशा परिस्थितीत ओलेना देशवाशियांना घाबरू नका, हिंमतीने लढाई लढा, असे सांगत आहेत.


हेही वाचा – Russia Ukraine War: रशियाला दहशतवादी देश म्हणत युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले, ‘आम्हाला कोणी तोडू शकत नाही’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -