घरमनोरंजनWow किती गोंडस बाळ... मालती मेरीच्या इस्टरचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी दिली...

Wow किती गोंडस बाळ… मालती मेरीच्या इस्टरचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

ग्लोबर स्टार प्रियंका चोप्रा सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. याबाबत तिचे नवनवीन अपडेट ती सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियंका आपल्या पती आणि मुलीसोबत भारतात आली होती. यावेळी तिने अनेक ठिकाणी भेट दिली शिवाय मुलीला घेऊन मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यावेळचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशातच मालती मेरीच्या पहिल्या इस्टरचे फोटो शेअर केले आहेत. जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्रियंकाने शेअर केले मालतीच्या पहिल्या इस्टरचे फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर इस्टर सेलिब्रेशनमधील मालतीच्या पहिल्या इस्टरचे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये मालती प्रियंकासोबत दिसत आहे. या फोटोत मालतीने पांढरा टी-शर्ट घातला असून त्यावर मालती मेरी फर्स्ट इस्टर लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियंका तिच्या मुलीसोबत सेम कपड्यांमध्ये बाथरुममध्ये मालतीसोबत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तिसर्‍या फोटोत मालती एकटी बसली आहे. तर शेवटच्या फोटोत मालती तिच्या लॉनमध्ये सोफ्यावर बसलेल्या कुत्र्यांशी खेळत आहे.

- Advertisement -

तर इंस्टाग्राम स्टोरीवर प्रियंकाने मालती मेरीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यात मालतीने हेअर बँडसह पांढरा आणि पिवळा पोशाख घातलेला आहे. या फोटोमध्ये मालती अनेक फुलांनी वेढलेली दिसत होती. यात प्रियंकाने सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

त्याची तेवढी लायकी नाही… रणबीर कपूरला उर्फी जावेदचं सडेतोड उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -