घरमनोरंजनअरेरे, रॅम्पवॉक करताना गेला यामी गौतमचा तोल

अरेरे, रॅम्पवॉक करताना गेला यामी गौतमचा तोल

Subscribe

यादरम्यान, यामी गौतमने एकदाही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वास ढळू न देता रॅम्पवॉक पूर्ण केला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री यामी गौतम, पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका फॅशन शोदरम्यान रॅम्प वॉक करत असताना अचानक यामीचा तोल गेल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लिक करण्यात आला असून, इंटरनेटवर तो वाऱ्यासारखा पसरत आहे. मात्र, तोल जाऊनही न थांबता यामीने रॅम्पवॉक पूर्ण केल्याबद्दल जगभरातील लोक तिचं कौतुक करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘

डिझायनर गौरी आणि नैनिका यांच्या नव्या कलेक्शनसाठी यामी गौतम रॅम्पवर उतरली होती. यामी या शोची ‘शो स्टॉपर’ होती. यावेळी यामीने गौरी आणि नैनिका यांनी डिझाईन केलेला खास पार्टी गाऊन परिधान केला होता. मात्र, गाऊनच्या लांबीने बहुधा तिचा घात केला. रॅम्पवॉक सुरु करतानाच यामीच्या पायात ड्रेस आल्यामुळे ती अडखळली. त्यानंतरही एक-दोनवेळा हा ड्रेस तिच्या पायात आला. मात्र, यामुळे यामी एकदाही थांबली नाही. प्रत्येकवेळी त्याच उत्साहाने तिने आपला वॉक चालू ठेवला. यादरम्यान, एकदाही तिने तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वास ढळू दिला नाही. याबद्दल चाहते यामीचं कौतुक करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -