घरमुंबईपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विषबाधा, मग मुंबईकरांची काय तऱ्हा?

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विषबाधा, मग मुंबईकरांची काय तऱ्हा?

Subscribe

महापालिकेच्या बी वॉर्डमधील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून कॅन्टीनच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अन्नातून विषबाधा होऊन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक मुंबईकरांना त्रास होतो, अशा घटना आपण ऐकल्या आहेत. पण, आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या बी वॉर्डमधील बाबुला टँक रोड येथील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. सकाळी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बनवलेल्या इडलीमधून या कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली असल्याचं समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना उलट्या, डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जवळच्या साबुसिद्धीकी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर ४ वाजण्याच्या सुमारास जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एकूण १० जणांना विषबाधा झाल्याची माहिती जे.जे. हॉस्पिटलमधून मिळाली आहे. यामध्ये ६ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तर सर्वांची प्रकृती स्थिर असून प्रतिक्षा मोहिते यांचा रक्तदाब कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

इडलीतून विषबाधा

पालिकेच्या १० अधिकाऱ्यांना विषबाधा झाल्याप्रकरणी दुपारी साडेचार वाजता जे. जे. मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. प्राथमिक अंदाजानुसार, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, इडली खाल्ल्याने विषबाधा झाली असावी. सकाळी ९ ते १० च्या सुमारास या अधिकाऱ्यांनी इडली खाल्याचे बोलत आहेत. त्यानंतर त्यांना डिहायड्रेशन, डोक दुखणं, मळमळण, उलट्या, जुलाब असा त्रास सुरू झाला. पण, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं ही डॉ. सुरासे यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

– डॉ. संजय सुरासे, जे. जे. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक

रुग्णांची नावे खालीलप्रमाणे

निशांत सूर्यवंशी – २७
कृष्णकांत धनावडे – ४९
चंद्रकांत पाटील – २५
तनय जोशी – ५६
चंद्रकांत जांभळे – ४६
तृप्ती शिर्के – ३५
प्रतिक्षा मोहिते – २१
सविता पंडीत – ३५
सुषमा लोखंडे – ४७
नरसिंहा कांचन – ६५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -