घरफिचर्ससब सही है

सब सही है

Subscribe

मुंबई नगरी बडी बाका

’ऑफिसची जडच्या जड बॅग, तेच्यात बाबा आदमच्या काळात जल्मलेला लॅपटॉप तोबी, त्याच्या ढाई किलूच्या चार्जर सहित. वरून मंग घरचं ते पौष्टिक म्हणून बायकोनं देलेला डब्बा, बाहेरचं विकतचं पानी नको म्हणून घेतलेली पाण्याची बॉटली, इतकं समोरच्याला दिसणारं वज्ज अन शोक्कानं घेतलेल्या गाडीचं, बायको लेकरायसाठीची प्रॉपर्टी असलेल्या फ्लॅटचं, लेकरायच्या शाळा कॉलेजचं, फिरणंगिरनं, चुटूरमुटुर असल्या बाकी खर्चायचं नं दिसणारं पण जास्तीत जास्त जेरीला आणणारं वज्ज घेयून आलेला आपल्यासारखा मुंबईकर चाकरमानी.

सोताच्या बॅगला ना लोकलच्या स्टॅन्डवर ना कुणाच्या आकड्यावर जागा नं मिळाल्यानं आपल्या बारक्या खांद्यावर वागऊन कारवादून गेलेला मिसरा बोलला ’सही है’. पर बुडाखाली शीट असलेला आमच्याच गावकडला जगताप तरीपन बोललाच..’आधीच इथ्थली गर्दी, घरची बायको, ऑफिसचा बॉस, मंडईतली भाजी, टीव्हीतली ऍडव्हरटाईझींग,पेट्रोल पम्पावरचं पेट्रोल, भय वाटावं असला आलेला टाइम त्यात काय कमी ठासुलालाय व्हय रे? तेच्यात आणि तुझ्या गरळ बोलायची भर कशाला’

- Advertisement -

आता असलेल्या गर्दीत हाय तेच्यापेक्षा कितीतरी जड झालेल्या बॅगेच्या बंदाला वर करू खांद्याला आराम द्यायची नाकाम कोशिश करीत असलेला मिसरा पुन्ना बोलला ’सही है’
मी काही बोलणार एवढ्यात बसल्याजागचा जगताप पुन्हा उचकला
’क्या सही है? उधर लोग ट्रेन के सामने आकर मर रहे है. पानी पडलं नाही या बारीला दुस्काळात ट्रेन न्यावी लागन पाण्याची, पीक विमा मिळालं नाही तर लोकं जीव देतीन. महंगाइ आस्मान छू रही है. और तू यहा खडा होकर बोलरा सही है?’
’पेट्रोल’ हात तोंडावर घेत पेडणेकर अंकल म्हणले
’मी हल्ली स्टेशनवर गाडी आणतच नाही.सकाळी ऑफिसला जायला सरळ शेरिंग ऑटो करतो आणि येतो. आता जाताना चालतच जातो घरापर्यंत तेवढाच व्यायाम शरीराला आणि पैशाची सेविंग’
बोरिवली गेलं तसं उस्मानभाई उठला. नंबराप्रमाणं मला बसायला जागा मिळाली. ती मी मिसराला दिली. आनंदाने बसून आपल्या बॅगेला मांडीवर घेत तो बोलला ’सही है’
’सत्तर वर्ष झाले स्वतंत्र्य होऊन. आधीच्यांनी काही काम केलं नाही. आजून आपला देश कितीतरी मागे आहे म्हणे. अजूनसुद्धा काही काही बदल नाही. आपल्या परिस्थितीत. यापेक्षा इंग्रज बरे म्हणायचे’ राणे फिस्कारले.

रोज एफयमवर टरारनार्‍या लोकायसारखं सारखंच बोलणारा मी आज फक्त थांबल्याजागी ऐकत ऐकत विचार करत होतो .
स्वातंत्र्यानंतर प्रगती झालनी असं कसं म्हणावं. कारण आधी फक्त इंग्रजी सायफाय सिनेमात दिसणार लॅपटॉप आता या बारावी नापास मिसराकडेपण आलाय. पेडणेकरकाकाकडे स्वतःची गाडी आलीय. अन तुम्ही हो जगताप उदगीरसारख्या खोपदाडातून येऊन इथे मुंबईत जागा घेतलीय की गा. आज दुष्काळी भागात गाडीनं का होईना पानी जातंय. पीकविमा मिळतोय. आता मागच्या सत्तर वर्षात काहीच झालं नाही असं कसं म्हणावं हो. आता प्रगती पस्तीस टक्क्यावरून छत्तीस टक्क्यावर गेली. तरी ती प्रगतीच राहतीय की. इथं तर ती साठ टक्क्यापेक्षा पुढी जाऊन फस्क्लास फस्टआय. भारतात अजूनसुद्धा कितीतरी गावात लाईट गेलनी मन, खराय.

- Advertisement -

पण कितीतरी लै गावात ती लाईट गेलीय हि पण खरायच की. बाकी कस्मे वादे करणारे अन पुरं नं करणार तवा होते ते आत्ता बी हैत. वाईट- वाईट-वाईट त्रिवार वाईट हायच परिस्थिती, नाही कोण म्हणतंय. पर जोडीनं थोडं का हुईना बरं बी चाललं हायच ना. आता मान्य हाय बरं कमी हाय. जे बरं हाय ते आजु कमी करायचा प्रयत्न निरंतर सुरूच हायच. धर्माधर्मात फायटिंग लावणार लोक आधी होतं आता बी हाय पर आता लोक भांडना ना पैलेसारकं. म्हणजे मला तसं वाटतंय माझ्या बाजूला उभ्या उस्मानला बी तसंच वाटतंय. असा विचार केल्यावर मला मग उगंच भारी वाटलं, मी शिट्टी मारत मिसराकड बघितलं त्यानं हसत माझ्याकडं बघत म्हणला
’सही है’
मी म्हणलं सब सही है.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -