घरफिचर्सपुरुषांना महिलांचे शरीर पटकन समजते मग, मन का समजत नाही?

पुरुषांना महिलांचे शरीर पटकन समजते मग, मन का समजत नाही?

Subscribe

पद्मा (काल्पनिक नाव) पतीपासून विभक्त राहत असताना ती एका ऑफिसमधील पुरुष सहकार्याच्या प्रेमात पडली. अंतरधर्मीय असे हे प्रेम प्रकरण सुरुवातीला सहज सोपे वाटत होते. परंतु, सलीम (काल्पनिक नाव) प्रचंड जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांचा होता.

पद्मा (काल्पनिक नाव) पतीपासून विभक्त राहत असताना ती एका ऑफिसमधील पुरुष सहकार्याच्या प्रेमात पडली. अंतरधर्मीय असे हे प्रेम प्रकरण सुरुवातीला सहज सोपे वाटत होते. परंतु, सलीम (काल्पनिक नाव) प्रचंड जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांचा होता. तो ऑफिसमध्ये जितका स्मार्ट, फॉरवर्ड, कॉर्पोरेट वागतो तितका वैयक्तिक आयुष्यात, वैयक्तिक जीवनात पूर्ण मागासलेला होता. सातत्याने पद्माला तिच्या धर्म विषयक अपमानास्पद बोलून, तिच्या धर्मातल्या चुका काढून, तिच्या वागणुकीला स्वतःच्या धर्माशी तुलना करून तो मानसिक खच्चीकरण करत असे. पद्माला सतत त्याच्या धर्मातील स्त्रियांशी तुलना करून ती किती आणि कशी चारित्र्यहीन आहे, तीचं राहणीमान कस चुकीचं आहे आणि त्याचा धर्म स्त्रियांच्या बाबतीत कसा महान आहे यावरून सतत वाद घालत होता. कोणत्याही बाबतीत तो धर्माचेच दाखले देत राहायचा.

पद्माला स्वतः बद्दल थोडा पण आत्मविश्वास राहिला नव्हता. ती त्याच्या सतत होणार्‍या टीकांमुळे खचून गेली होती. जयश्री (काल्पनिक नाव) दोन-तीन वर्षे फक्त नवर्‍याच्या घरी राहून कौटुंबिक वादांमुळे माहेरी आलेली महिला. मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात झालेले रूपांतर यात गणेश (काल्पनिक नाव) बर्‍यापैकी आर्थिक परिस्थिती असलेला. हळूहळू एकमेकांना भेटणं, बोलण यात दिवस पुढे जात होते. जयश्री जेव्हा समुपदेशनसाठी आली तेव्हा ती गणेशच्या काही सवयींना प्रचंड वैतागलेली होती. गणेश सतत मला आमच्या भेटीचं ठिकाण मॅनेज करायला लावतो. त्याचं स्वतःच घर कुठे आहे, हे सुद्धा त्यानं मला नीट सांगितलेलं नाही. पण माझ्या घरी मी आणि माझी दोन मुलं असतात. तसेच माझे आई-वडील वयोवृद्ध आहेत.हे त्याला माहिती असल्यामुळे त्याची अपेक्षा असते की, आम्ही माझ्याच घरी भेटावं. माझा नवरा माझ्या सोबत नाही म्हणजे मी सगळ सहज मॅनेज करू शकेल, असं त्याच म्हणणं आहे. मी काहीही करून आम्हाला एकांत मिळावा अस ठिकाण स्वतः शोधावं यासाठी तो आग्रह धरतो. मी एक सर्वसामान्य महिला आहे. मला यातलं काही जमत नाहीये, माहिती नाहीये म्हणून तो माझ्याच घरी भेटायला प्राधान्य देत असतो. तो घरी आला की मला माझ्या मुलांना काहीही निम्मित करून घराबाहेर जायला सांगावं लागत. माझं स्वतःच घर असून ते वडिलोपार्जित आहे.इथे मला आणि माझ्या आईवडिलांना अनेक वर्षांपासून आजूबाजूचे लोक ओळखतात. पण गणेश म्हणतो लोकांशी काय करायचं आहे. तूझ्या घरात कोण नाही तुला विचारणार.तू मोकळी आहेस. एकटी आहेस, स्वतंत्र आहेस.गणेशला मी खूपदा विनंती केली की, आपण बाहेर फिरायला जाऊ. तर तो म्हणतो तुझं घर असताना कशाला पैसे खर्च करायचे. त्याच्या घरी किंवा त्याच्या मित्राच्या घरी भेटायचं का विचारलं तर तो म्हणतो, ‘मला समाजात खूप लोक ओळखतात, माझं रेप्युटेशन आहे. माझ्या घरी माझी बायको आहे. माझे सगळे मित्र तिच्या ओळखीचे आहेत मी रिस्क घेऊ शकत नाही. जे काय मॅनेज करायचं ते तूच कर.’ यावरून आमचा वाद झाला तर गणेश डायरेक्ट मला बोलला असंही तूला शारीरिक गरज आहे म्हणून एकत्र आहोत ना. माझं काहीही अडलेलं नाहीये. तूझ्या घरात सेफ आहे भेटणं, कोणाचा त्रास नाही, कोणाला उत्तर द्यायची गरज नाही. कोणाचीच भीती नाही. बघ तुला जमत असेल तर अन्यथा आपला विषय सोडून दे. माझ्याकडून काहीच होऊ शकणार नाही. म्हणजे मी पतीपासून लांब राहते याचा अर्थ असा की, मला काहीच इज्जत नाही. सामाजिक प्रतिष्ठा नाही, मला विचारणार कोणी नाही, माझ्या मुलांवरचे संस्कार महत्वाचे नाहीत का? त्यातूनही काही दिवस काही वेळा त्याने भेटण्याबाबत थोडा पुढाकार जर घेतला, स्वतः काही पर्याय शोधला तर मलाही थोडं रिलॅक्स वाटेल. माझ्या आजूबाजूला चर्चा होत असते मी यातून कसा मार्ग काढावा.

- Advertisement -

जयश्री गणेशच्या आणि तिच्या संबंधांना प्रेम आधार समजत होती आणि त्याप्रमाणे त्यांना भेटता यावं यासाठी जास्तीजास्त प्रयत्न तीच करीत होती. पण महिला ज्याला प्रेम समजतात ते खरंच प्रेम आहे की फक्त समोरील पुरुषासाठी तो चेंज अथवा मजा आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या महिलांना त्या रेलशनशिपची सर्वांगीण गरज असू शकते. एखादी महिला जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवते, तुम्हाला प्रेम देते तीचं सर्वस्व देते तेव्हा ती शरीराने कमी पण मनाने जास्त गुंतलेली असते. घरात न मिळालेले प्रेम, आपलेपणा ती बाहेर शोधात असते. त्यावेळेस केवळ तिच्या एकटेपणाचा, असहायतेचा गैरफायदा पुरुषाने घेणे कितपत योग्य आहे. तिच्या प्रेमाला भावनांना गरज असच का म्हटलं जावं. सगळ्याच महिलांना एकाच नजरेने पाहणे आणि एकाच तराजूत तोलन कितपत योग्य आहे. कोणतीही महिला एखाद्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवते तेव्हा ती फक्त पैशासाठी त्याच्या मागे लागली, त्याला लुबाडते, लुटते, त्याच्या पैशावर मजा मारते, असले लेबल फार चटकन चिकटवले जातात. पण हिच परिस्थिती उलटी देखील असू शकते. पुरुषांना स्त्रीच शरीर खूप पटकन समजतं. पण तीचं मन का समजत नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

-मीनाक्षी जगदाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -