घरफिचर्सनातं राष्ट्रध्वजाशी

नातं राष्ट्रध्वजाशी

Subscribe

देशासाठी प्रत्येक जवान आपलं हे राष्ट्रध्वजाशी असणारं नातं निभावत असतो. पण त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची अवस्था आपण समजूनही घेऊ शकत नाही. आपला एक मुलगा जेव्हा संपूर्णतः आपण मातृभूमीसाठी अर्पण करत असतो तेव्हा त्या आईचं काय होत असेल? आपण लहानसहान गोष्टीतही रडत बसतो, उदास होतो.

गेल्याच आठवड्यात मेजर कौस्तुभ राणेंच्या बातमीनं सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. असेच कितीतरी ऑफिसर्स, पोलीस, जवान यांचं राष्ट्रध्वजाशी आणि राष्ट्राशी एक नातं असतं. ते नातं निभावताना ते आपल्या जीवाची आणि अगदी आपल्या कुटुंबाचीही पर्वा करत नाहीत. लहानपणापासूनच आपल्या प्रत्येकाच्या मनावर राष्ट्रध्वजाचं प्रेम बिंबवण्यात आलं आहे आणि ते प्रत्येकवेळी आपण अभिमानानं दर्शवतो. भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचं प्रतिक मानलं जातं. हाच राष्ट्रध्वज अभिमानानं फडकत राहावा यासाठी सशस्त्र जवानांसह अनेक लोकांनी आपले प्राण नेहमीच पणाला लावले आहेत आणि हेच नातं आहे त्या राष्ट्रध्वजाशी. सर्वात पहिले रक्षण करायचं ते आपल्या मातृभूमीचं, हाच विचार घेऊन प्रत्येक जवान सीमेवर देश हेच आपलं पहिलं कुटुंब आहे हा विचार करून लढा देत राहतो. त्या राष्ट्रध्वजाच्या प्रेमापोटीच कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ त्या जवानाला मिळतं.

सीमेवर तैनात असणारे जवान असो वा २४ तासाची ड्युटी करावी लागत असल्यामुळे सणासुदीला आपल्या कुटुंबाच्या सहवासापासून दूर राहावे लागणारे पोलीस असोत. प्रत्येक जण हा त्या राष्ट्रध्वजाच्या असलेल्या नात्यापोटीच जगत असतो. तुम्ही म्हणाल की, बरेच भ्रष्टाचारीही असतात, मग त्यांचं नातं नसतं का? अर्थात त्यांचंही नातं असतं. पण हाताची पाचही बोटं सारखी नसतात याच उक्तीप्रमाणे काही लोक परिस्थितीमुळे असो वा अन्य कोणत्याही कारणासाठी चुकीचे वागतात. पण त्यामुळं सरसकट सर्वच देशभक्ती असणार्‍या आणि राष्ट्रध्वजाशी नातं निभावणार्‍या लोकांना एकाच तराजूमध्ये तोलणं योग्य नाही.

- Advertisement -

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण आणि अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहील. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे हे सगळे नियम म्हणजे राष्ट्रध्वजाला मानवंदना आहे आणि ही मानवंदना प्रत्येक जवानामध्ये अगदी तंतोतंत उतरलेली असते.

देशासाठी प्रत्येक जवान आपलं हे राष्ट्रध्वजाशी असणारं नातं निभावत असतो. पण त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची अवस्था आपण समजूनही घेऊ शकत नाही. आपला एक मुलगा जेव्हा संपूर्णतः आपण मातृभूमीसाठी अर्पण करत असतो तेव्हा त्या आईचं काय होत असेल? आपण लहानसहान गोष्टीतही रडत बसतो, उदास होतो. पण त्या कुटुंबाचं काय होत असेल? जिचा मुलगा महिना महिना बर्फात कोणताही तक्रार न करता जागता पहारा देत असतो. त्या जवानाच्या पत्नी आणि मुलांचं काय? मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीला आणि मुलाला पाहताना त्यानं राष्ट्रध्वजाशी निभावलेलं नातं प्रकर्षानं जाणवलं.

- Advertisement -

मात्र आपण अजूनही इथे जातीपातीच्या नावाखाली राजकारण पाहत आहोत. हेच नातं राजकारणाच्या आहारी न जाता आपणही नाही का निभावू शकत? असा प्रश्न निर्माण होतो. पण केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी आपल्याकडच्या लोकांची स्थिती झाली आहे. केवळ स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवून देशभक्ती सिद्ध होत नसते. तर ती राष्ट्रध्वजाचा मान राखूनही सिद्ध करायला हवी. एक दिवस झेंडा विकत घेऊन हे नातं निभावू नका. तर कायमस्वरूपी या झेंड्याचा अर्थात राष्ट्रध्वजाशी आपलंही एक नातं आहे हे समजून त्याचा मान राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे गरजेचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -