घरदेश-विदेशराज्यातील ५१ अधिकाऱ्यांचा पोलीस पदकाने गौरव

राज्यातील ५१ अधिकाऱ्यांचा पोलीस पदकाने गौरव

Subscribe

गृहमंत्रालयाने देशभरातील ९४२ अधिकाऱ्यांना उत्तम कामगिरीसाठी विविध पदकाने गौरविले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ५१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाने देशभरातील ९४२ अधिकाऱ्यांना उत्तम कामगिरीसाठी विविध पदकाने गौरविले आहे. त्याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ५१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये ३ राष्ट्रपती पोलीस पदके, ४० पोलीस पदके आणि पोलीस कर्मचाऱ्यांना ८ शौर्यपदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील २ अधिकाऱ्यांचा देखील गौरव होणार आहे. मुंबईतील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेशाम पांडे, नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा देखील समावेश आहे.

कुणाकुणाचा होणार गौरव

बाळू प्रभाकर भवार हे नाशिक शहरामधील नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. शिवाजी तुळशीराम बोखाडे हे नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. तर दयानंद हरिश्चद्र ढोमे हे पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक आहेत. या तिघांचाही राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव करण्यात येणार आहे.

- Advertisement -

शितलकुमार अनिलकुमार डोईजड हे पोलीस निरीक्षक आहेत. पोलीस कॉन्टेबल सोमनाथ पवार, पोलीस निरीक्षक हर्षद काळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर मडावी, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाकेवार, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, नायब पोलीस कॉन्स्टेबल टिकाराम काटेंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र तडमी यांना शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच ४० पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदके मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -