घर फिचर्स सारांश जिगोलोंची नरकमय दुनिया!

जिगोलोंची नरकमय दुनिया!

Subscribe

पैशांच्या बदल्यात लैंगिक गरजा भागवणार्‍या पुरुषांना जिगोलो असे म्हणतात. मुळात लैंगिक आकर्षण, जबरदस्त लैंगिक इच्छा हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. त्यात समाजात महिला वेश्यांचे प्रमाण जास्त असल्याने काही कालावधी लोटल्यानंतर त्यांच्या समस्या, अडचणी यांबद्दल उघडपणे बोलले गेले. त्या प्रमाणात जिगोलोंबद्दल उघडपणे बोलले गेले नाही. पुरुष वेश्यांचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यांच्यादेखील मोठ्या समस्या आता समोर येऊ लागल्या आहेत. लैंगिक आणि आर्थिक गरज एखाद्याचे आयुष्य कसे नरकात ढकलून देते, याची अनेक उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. शरीरविक्री करणार्‍या जिगोलोंची खरी दुनिया आणि त्या दुनियेचे सत्य समाजात माहीत होणे आता गरजेचे बनले आहे. ती काळाची गरज आहे.

– रोशन चिंचवलकर

माणूस हा जीव आणि त्याच्यासोबत पृथ्वीवर जगणारे इतर जीव यांची इतर गरजांप्रमाणे लैंगिक गरज ही अत्यंत महत्वाची गरज आहे. इतर प्राणी नैसर्गिकरित्या आपली ही गरज भागवत असतात. माणूस उत्क्रांत झाला. त्याच्याकडे इतर साधन सुविधा आल्या. त्याने स्वत:चे असे एक जग निर्माण केले. त्यानंतर त्याने आपल्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी त्याच्या दृष्टीने त्याला वाटणारे अनेक नैतिक मार्ग शोधले. या गरजांना त्याने व्यवसायाचे स्वरूप दिले. त्यानंतर जगभरात निर्माण झालेले वेश्याव्यवसाय सर्वांसमोेरच आहेतच.

- Advertisement -

चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणार्‍या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते, पण क्वचित आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणार्‍या वेश्याही आढळतात.

वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात, पण पुरुषांनी पुरुषांबरोबर किंवा स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकारदेखील अस्तित्वात आहे. अशा या पैशांच्या बदल्यात लैंगिक गरजा भागवणार्‍या पुरुषांना जिगोलो असे म्हणतात. मुळात लैंगिक आकर्षण, जबरदस्त लैंगिक इच्छा हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. त्यात समाजात महिला वेश्यांचे प्रमाण जास्त असल्याने काही कालावधी लोटल्यानंतर त्यांच्या समस्या,अडचणी यांबद्दल उघडपणे बोलले गेले.

- Advertisement -

त्या प्रमाणात जिगोलोंबद्दल उघडपणे बोलले गेले नाही. पुरुष वेश्यांचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यांच्यादेखील मोठ्या समस्या आता समोर येऊ लागल्या आहेत. लैंगिक आणि आर्थिक गरज एखाद्याचे आयुष्य कसे नरकात ढकलून देते, याची अनेक उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. शरीरविक्री करणार्‍या जिगोलोंची खरी दुनिया आणि त्या दुनियेचे सत्य समाजात चर्चिले जाणे आता गरजेचे बनले आहे. ती काळाची गरज आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून दुनिया जवळ आली आहे. त्यामुळे दोन व्यक्तींना एकमेकांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क करणे शक्य झाले आहे. या इंटरनेटच्या जगाचा वापर जसा एकमेकांचे मनोरंजन, मानसिक गरजा भागवण्यासाठी केला जात आहे. तसाच शारीरिक गरजा भागवण्यासाठी केला जात आहे. या अशा मायाजालात नवी तरुण पिढी फसण्याची शक्यता जास्त आहे. सामान्यत: पुरुषांना सुरुवातीला अशा मिळालेल्या संधी आकर्षित करतात, पण एकदा का या शरीरविक्रीच्या जाळ्यात आयुष्य गुंतलं गेलं की बाहेर येणे किती मुश्कील असतं, हे त्यात जे गुरफटले आहेत त्यांनाच माहिती.

लैंगिक संबंध ठेवण्याची संधी त्यातून मिळणारे भरपूर पैसे यामुळे साहजिकच बरेच जण या जिगोलो होण्याचा मार्ग पत्करू शकतात, परंतु त्यानंतर होणार्‍या परिणामांची आधी तपासणी अशा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. आपल्या देशात हा व्यवसाय समजायचा झाला तर बर्‍याच महानगरांत हा जिगोलो व्यवसाय चालवला जातोय. यातून जे बाहेर पडले आहेत, ते इंटरनेटवर आपले अनुभव कथन करताना दिसतात. दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांतील ज्यांनी हा व्यवसाय केला आहे, असे जिगोलो आपला अनुभव सांगताना अक्षरश: रडकुंडीला येताना दिसतात.

हा व्यवसाय केलेला महानगरातील एक तरुण सांगतो, माझं दिसणं आणि शरीरयष्टी चांगली होती. मला मॉडेलिंग करायचे होते. तसेच अभिनय करण्याची इच्छा होती. एक दोन नाटकांतदेखील मी काम केलं होतं, परंतु मॉडेलिंगसाठी लागणारे पैसे माझ्याकडे नव्हते. त्यानंतर त्याच मॉडेलिंग एजन्सीद्वारे माझा संपर्क एका एस्कॉर्ट एजंटशी आला. मला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल,असेही सांगितले गेले. त्यानंतर मी निरनिराळ्या शहरांत अनेक ग्राहकांच्या मागणीवरून पोहोचायचो. ते पैसे तर भरपूर द्यायचे, ज्यात काही टक्के कमिशन हे एजंटचे असायचे, पण वापरदेखील एखाद्या वस्तूप्रमाणे केला जायचा. कधी एकटाच ग्राहक असायचा, कधी एखादे जोडपे तर कधी एखादा ग्रुप लैंगिक गरजा भागवण्यासाठी संपर्क करायचा. महिन्यातून किमान २० ते २५ दिवस तरी मला हे काम करावं लागायचं.

त्यात शरीराच्या कार्यक्षमतेला एक सीमा असल्याने शरीराचीदेखील निगरानी करावी लागायची. जीम, चांगले डाएट, निरनिराळी उत्पादने यासाठी माझ्या एकूण कमाईचा ८० टक्के भाग खर्च होत होता. त्यामुळे आर्थिक जम पण बसत नव्हता. या व्यवसायातून पैसा कमवेन आणि नंतर हे सर्व सोडून हवं ते करेन याची स्वप्न मी बघत होतो, पण झालं भलतंच. लैंगिक गरजा भागवण्यासाठी येणारे विचित्र ग्राहक, त्यांची प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक, त्यांच्याबरोबर करावे लागणारे दारू, ड्रग्स यांचे व्यसन यात मी पुरता अडकलो. एका वेळेला तुमची शारीरिक गरज भागली की, जिगोलोची ही दुनिया किती भयानक आहे ते तुम्हाला समजेल. यातून बाहेर पडण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण एजन्सीवाले मला ब्लॅकमेल करत होते. समाजात इज्जत जाण्याची चिंता मला होती. शेवटी एका वकिलाच्या मदतीने या नरकासमान दुनियेतून मी बाहेर आलो.

या व्यवसायात अडकलेला दुसरा तरुण सांगतो की, एका फिल्मच्या ऑडिशनसाठी मी एका एजन्सीकडे गेलो होतो. आर्थिक चणचण होती, त्यामुळे कामाचीदेखील आत्यंतिक गरज होती. त्या एजन्सीने माझ्या शरीरात, वागण्या-बोलण्यात चुका काढून मी कसा अभिनयासाठी योग्य नाही हे सांगितले. त्यानंतर माझी आर्थिक बाजू ओळखून आणि मला आधार देण्याचा बहाणा करून मला एका एस्कॉर्ट एजन्टच्या संपर्कात आणले गेले. त्यानंतर माझ्या या व्यवसायाला सुरुवात झाली. त्यातील ५० टक्के रक्कम एजंट कमिशन घ्यायचा आणि उरलेली रक्कम मला मिळायची. आपल्या अनेक ग्राहकांचे विचित्र प्रसंग सांगताना तो म्हणतो की, लग्न झालेली जोडपीदेखील ग्राहक म्हणून यायची आणि त्यांच्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी भरपूर पैसे मोजायची. समाजाचा असा चेहरा बघून सुरुवातीला आतून संपूर्णपणे हादरायला झाले होते, पण आम्ही फक्त पैसे देऊन खरेदी केलेली एक वस्तू असल्याने ते सांगतील ते करायची वेळ यायची. दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.

या दोन अनुभवात एक गोष्ट समान आहे. तुमचं शरीर आणि कधीकधी दिसणं यांचा वापर या व्यवसायासाठी केला जातो. लैंगिक तृप्ती आणि पैसे ही एखाद्या तरुण व्यक्तीची महत्वाची गरज असते. दोन्ही गरजा एकत्र भागवल्या जात असतील तर जास्तीत जास्त जण अशा गोष्टींकडे आकर्षित होण्याची शक्यता असते, पण या जगाची वास्तविकता तरुण पिढीने समजून घेणे गरजेेचे आहे. लैंगिक आणि आर्थिक गरजा भागवण्यासाठी स्वत:चे आयुष्य समस्यांच्या खाईत लोटले तर जाणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे.

- Advertisment -