घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य :सोमवार 18 सप्टेंबर 2023

राशीभविष्य :सोमवार 18 सप्टेंबर 2023

Subscribe
मेष : कामातील अडचणी कमी होतील. धंद्यात सुधारणा करा. कर्जाचे काम मार्गी लागेल. घर, जमीन घेण्याचा विचार कराल.

वृषभ : धंद्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कामगारांची कमी भरून काढता येईल. चर्चा सफल होईल.

मिथुन ः नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. नोकर वर्गाला दुखवू नका. धंद्यात मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

कर्क : नोकरीत तुमचा मुद्दा वरिष्ठांना पटवून देता येईल. चर्चा यशस्वी करू शकाल. गुरूतुल्य व्यक्तीची भेट घडेल.

सिंह : किरकोळ कारणाने अडचण येईल. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल.

- Advertisement -

कन्या ः घरगुती वाद होईल. पोटाची काळजी घ्या. वस्तू नीट सांभाळा. महत्त्वाचे काम करताना घाई करू नका.

तूळ : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. बोलताना नम्रता ठेवा. मोठ्या लोकांचा सहवास घडेल. उत्साह राहील.

वृश्चिक : किरकोळ कामे करण्याचा आळस करू नका. तुमच्या कार्याला योग्य दिशेने नेता येईल.

धनु : सकाळी वाटणारी अस्वस्थता दुपारनंतर कमी होईल. मान-सन्मानाचा योग येईल. धंदा मिळेल.

मकर : मनावर दडपण येईल. वरिष्ठांची मर्जी राखा. तुम्हाला मिळणारा मान कशामुळे आहे हे लक्षात घ्या.

कुंभ : सकाळची अस्वस्थता थोडा वेळ राहील. तुम्ही दगदग कमी करा. शब्द जपून वापरा. नम्र रहा.

मीन : घरगुती कामे वाढतील. खर्च होईल. अनेक कामांची गर्दी झाल्याने धावपळ वाढेल.

- Advertisment -