घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ४ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : शनिवार ४ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : धंद्यात फायदेशीर योजना शोधता येईल. मैत्री वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. नोकरी मिळेल.

वृषभ : प्रयत्नाने तुम्ही तुमची कामे करण्यात यश मिळवू शकाल. घरातील वाद, नाराजी जास्त वाढू देऊ नका. व्यसन करू नको.

- Advertisement -

मिथुन : मनावर दडपण येईल. नोकरीत काम वाढेल, पण तुमची प्रतिमा सतेज राहील. स्पर्धेत कष्ट करा. यश मिळेल.

कर्क : जास्त महत्वाचे काम आजच करा. भेट घेता येईल. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. नम्रपणे तुमचे मत मांडा.

- Advertisement -

सिंह : नवीन थोरा-मोठ्या व्यक्तींचा सहवास मिळेल. लाभ होईल. जुने येणे वसूल करा. ऐशोरामात रहाल. प्रतिष्ठा मिळेल.

कन्या : नोकरीत वरिष्ठांच्या विचारांचा आदर करावाच लागेल. नातलगांच्या बरोबर प्रेमाने वागा. स्वतःची काळजी घ्या.

तूळ : धावपळ, दगदग होईल. नवीन ओळखी होतील. कला क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. प्रवासात घाई नको.

वृश्चिक : खर्च वाढेल. मैत्रीत फसगत होईल. पैसे उसने देऊ नका. राजकीय क्षेत्रात सर्वांच्या मतांचा आदर केल्यानेच प्रश्न सुटेल.

धनु : किरकोळ अडथळे येतील. रस्ता जपून ओलांडा. दुखापत होऊ शकते. जमीन, घर यासंबंधी अडचण वाढेल.

मकर : आजचे काम उद्यावर टाकू नका. ओळखीमुळे अडलेले काम होईल. कोर्टाच्या कामात यश मिळवाल.

कुंभ : अपेक्षित व्यक्तीची भेट घेण्यास छोटीशी समस्या येईल. जुना वाद शेजारी निर्माण करू शकतो. वस्तू सांभाळा.

मीन : वरिष्ठ तुमच्याकडे जबाबदारी देतील. कठीण काम करून दाखवाल. नम्रता ठेवा. गोड बोला. मदत मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -