Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार 19 सप्टेंबर 2023

राशीभविष्य : मंगळवार 19 सप्टेंबर 2023

Subscribe

मेष : संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. तुमचे विचार पटले तरी निर्णयास वेळ लागेल.

वृषभ : नोकरीतील ताण कमी करता येईल. घरातील कामे करता येतील. कोर्ट कचेरीच्या कामात सहाय्यता मिळेल.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत वरिष्ठांचा कल पाहूनच बोला. तुमचे मन स्थिर ठेवता येईल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

कर्क : धंद्यात कामे मिळतील. वसुलीसाठी प्रयत्न करा. घरातील व्यक्तीचा राग घालवता येईल. वरिष्ठांची मर्जी राखा.

- Advertisement -

सिंह : भावना व कर्तव्य नीट समजून घ्या. सरकारी कामात सतर्क रहा. कायद्यानुसारच निर्णय घ्यावा लागतो. धंदा मिळेल.

कन्या : सकाळी चहा घेताना सुसंवाद होणे कठीण असले तरी दुपारनंतर प्रश्न सोडवता येईल. नोकरीतील चूक सुधाराल.

तूळ : किरकोळ कारणाने मन अस्थिर होईल. त्यामुळे महत्त्वाचे काम करताना विचार करा. सौम्य शब्दात बोला.

वृश्चिक : तुमचे महत्त्व वाढेल. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. स्पर्धा जिंकाल.

धनु : प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. प्रकृती सुधारेल. प्रवासाचा आनंद घ्याल. धंद्यात वाढ करता येईल.

मकर : समस्या सोडवता येईल. नवीन ओळख होईल. स्पर्धेत तुमचे कौतुक होईल. नवे काम लवकर मिळवा.

कुंभ : धावपळ होईल. किरकोळ कारणाने मन अस्थिर होईल. जास्त भावनावश होऊ नका. परीक्षा कठीण वाटेल.

मीन : कार्यातील अडचणी कमी होतील. घरातील माणसांना न दुखवता कामे करा. धंद्यात लाभदायक घटना घडेल.

- Advertisment -