घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २८ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार २८ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – महत्त्वाची गाठ-भेट आजच करून घ्या. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात नवे काम मिळेल. कोर्टकेस यशस्वीरित्या हाताळाल.

वृषभ – जुना वाद काढू नका, समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात पडू नका.

- Advertisement -

मिथुन – धंद्यात वाढ होईल. कामगारांची विशेष काळजी घ्या. नवीन ओळखीवर विश्वास ठेवू नका. घरातील समस्या सुटेल.

कर्क – शत्रूंच्या गुप्त कारवायांना ओळखा, म्हणजे योग्य उपाय नंतर करता येईल. अहंकाराने वागू नका. धंद्यात जोखीम पत्करा.

- Advertisement -

सिंह – सामाजिक स्तरावर तुमचा आत्मविश्वास वाढेल. घर घेण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल. लोकांना मदत कराल.

कन्या – धंद्यात फायदा होईल, तुमचा विचार इतरांना पटल्याने समस्या लवकर सोडवता येईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ – कोर्टाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. घरातील सदस्यांसाठी मोठी खरेदी कराल.

वृश्चिक – मोठ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कामात लक्ष द्या. चूक होण्याची शक्यता आहे. हिशोब नीट तपासून घ्या.

धनु – आजचे काम व्यवस्थित पूर्ण करता येईल. मनाप्रमाणे निर्णय घेता येतील. घरातील कामात दगदग होईल. तब्येत सांभाळा.

मकर – राजकीय विरोध मोडून काढता येईल. गुप्त शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे गुपीत शोधून काढता येईल. सावधानता बाळगा.

कुंभ – धंद्यात चांगला जम बसेल, नवीन लोक जोडले जातील. नव्या विचारांना चालना मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. प्रवासात काळजी घ्या.

मीन – सामाजिक स्तरावरील कामे वाढतील. कला-क्रीडा स्पर्धेत यश मिळेल. पैसा, प्रसिद्धी मिळेल. नोकरीत पदाधिकार मिळेल. वाहन जपून चालवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -