घरभविष्यआजचे राशीभविष्यhoroscope today : मोक्षदा एकादशीला 'या' राशीच्या लोकांना मिळणार फायदा

horoscope today : मोक्षदा एकादशीला ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार फायदा

Subscribe

मोक्षदा एकादशीला मोक्ष देणारी एकादशी असेही म्हणतात. आज १४ डिसेंबरला दिवशी मोक्षदा एकादशी केली जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मोक्षदा एकादशी शुक्ल पक्षात पाळली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो अशी आख्यायिका सांगितली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. त्यामुळे मोक्षदा एकादशीचे महत्त्व आणखी वाढते. आज मोक्षदा एकादशी ही शुभ दिवस म्हणजेच मंगळवारी आली आहे. चंद्र दिवसभर मेष राशीतून भ्रमण करणार असून मंगळाशी षडाष्टक योग करीत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी ही मोक्षदा एकादशी लाभदायक ठरतेय. पाहू कोणत्या राशीच्या लोकांना ही मोक्षदा एकादशी फायदेशीर ठरणार आहे.

मेष

मेष राशीच्या लोकांना आजचा समाधानात जाईल. आर्थिक लाभ होईल. आरोग्य ठीक राहील मात्र घराकडे लक्ष देण्याची जबाबदारी येईल. समारंभाचा काश आला. बौद्धिक पातळीवर यश मिळवून देणारा दिवस चांगला जाईल.

- Advertisement -

मिथुन

या राशीचा लोकांचा आजचा दिवस निवांत असेल, मात्र सध्या तुम्ही कामात थोडे बिझी असल्याने काही गोष्टी त्रासदायक ठरतील. भावंडांची काळजी घ्या, प्रवासाचे योग येतील. घरासाठी विशेष खरेदी कराल. दिवस शुभ आहे.

सिंह

चतुर्थ मंगळ उष्णतेचे विकार देईल. पंचमातील बुध बौद्धिक लाभ देईल. स्वभाव अधित तापट होण्याची शक्यता मात्र हातून धार्मिक कार्य घडेल. चांगसा दिवस जाईल.

- Advertisement -

मकर

तुम्ही घरातली सर्वाधिक कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. खरेदीचे योग येतील. प्रकृती ठीक राहील मात्र वाहनं काळजीपूर्वक चालवा. राशीत शुक्र. आर्थिक गुंतवणूकीचा योग, चांगला दिवस जाईल.

वृषभ

आज तुमचा दिवस निवांत जाणार आहे. खर्च अचानक वाढतील. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. संतती कडून काही लाभ संभवतात. बौद्धिक प्रगती होईल. दिवस चांगला.

कुंभ

सुट्टीच्या निमित्ताने मौज-मज्जा करण्याचा प्लॅन ठरेल. काही महत्त्वाचे फोन होण्याची शक्यता मात्र आरोग्याची काळजी घ्या. भावंडाची भेट होईल. जोडीदाराचा मूड सांभाळा. दिवस उत्तम जाईल.

मीन

आर्थिक, शारीरिक अणि मानसिक सर्व बाबतीत तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय अचानक भरभराटच होईल. थकलेले पैसे मिळतील. प्रकृती साथ देईल याशिवाय कुटुंबियांकडून भरपूर सुख मिळेल.

कर्क

आज तुम्ही घरातच बिझी राहणार आहात. ऑफिस मध्ये जबाबदारी, त्याचे नियोजन असा दिवस जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. दिवस शुभ.

तुळ

आज तुळ राशीच्या व्यक्ती जोडीदाराला घेऊन फिरायला, खरेदीला जातील. सूर्य कार्यक्षेत्रात मोठा अधिकार देईल. दिवस चांगला आहे.

वृश्चिक

आर्थिक स्थिती उत्तम राहील मात्र प्रकृतीची काळजी घ्या. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. कोणाशीही वाद नको. मात्र मंगळ लौकरच नवीन संधी उपलब्ध करून देईल. दिवस शुभ.

धनु

आज संततीसाठी काम करावे लागेल त्यासाठी पैसा खर्च होतील. धार्मिक कार्य घडेल. किंवा प्लॅनिंग होण्याची शक्यता, राशीतील बुध वाणिज्य क्षेत्रात यश देईल. एकूण दिवस शुभ आहे.

कन्या

आज तुम्हाला आराम करण्याची गरज भासेल. फार दगदग करू नका. प्रकृती सांभाळा. पोटाचे त्रास होतील. खर्च फार वाढणार आहे. पण अनपेक्षित लाभ ही होतील. दिवस मध्यम जाईल.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -