घरताज्या घडामोडीDefamation case: जावेद अख्तर यांनी वाढवल्या कंगनाच्या अडचणी, अजामीनपात्र वॉरंटसाठी कोर्टात विनंती

Defamation case: जावेद अख्तर यांनी वाढवल्या कंगनाच्या अडचणी, अजामीनपात्र वॉरंटसाठी कोर्टात विनंती

Subscribe

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. मानहानी प्रकरणात कंगना रणौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती जावेद अख्तर यांनी मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टात केली आहे. कंगनाने न्यायालयाला दिलेलं स्पष्टीकरण खोटं असल्याचा दावा जावेद अख्तर यांनी याचिकेमध्ये केला आहे. कंगना शेवटच्यावेळी २० सप्टेंबरला न्यायालयात हजर झाली होती परंतु त्यानंतर तिने येण्यास टाळाटाळ केली असल्याचा दावा जावेद अख्तर यांनी केला आहे.

गीतकार जावेद अख्तर यांचे वकिल भारद्वाज यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये कंगना राणौतने मार्चनंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सूट मागितली होती याचा उल्लेख केला आहे. तसेच कंगना मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर आर खान यांच्यासमोर शेवटची हजर झाली होती. अभिनेत्रीने न्यायालयासमोर खोटी विधाने केली असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.

- Advertisement -

जावेद अख्तर यांच्या याचिकेनुसार कंगना रणौतने शेवटच्या सुनावणीवेळी २१ ऑक्टोबरला असा दावा करत न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी अशी विनंती केली होती. ताप आणि अंगदुखीचे कारण देत न्यायालयाला अर्ज केला होता. अर्जात कंगनाने अजारी असल्याचे सांगितले होते परंतु १५ नोव्हेंबरला कंगनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. या पोस्ट वरुन अशी माहिती मिळत आहे की, कंगना आपल्या आगामी चित्रपटासाठी चांगलीच सक्रिय आहे.

कंगना रणौतने आपल्या वकिलाच्या माध्यमातून असेही सांगितले होते की, मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या बदलीची याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी सुरु आहे. परंतु अर्जात असे म्हटलं आहे की, कंगना रणौतकडून मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या बदलीची याचिका फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात आव्हान देणारी कोणतीही याचिका दाखल करण्यात आली नाही. असे जावेद अख्तर यांच्या याचिकेत सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कंगना रणौतच्या वर्तनावरुन असे दिसतंय की, मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टातील प्रक्रिया सुरु असताना वेळ घेऊन कामकाजात वेळेचा अडथळा निर्माण केला आहे. प्रक्रियेला विलंब करुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच याचिकाकर्त्याच्या अडचणी वाढवण्यासाठी अस करण्यात येत असल्याचे जावेद अख्तर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान जावेद अख्तर यांच्या याचिकेमुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा :  करिना अमृता नंतर महीप कपूर आणि सीमा खानही कोरोना पॉझिटिव्ह

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -