घरभविष्यदिवाळीच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण; 27 वर्षांनंतर बनतोय अद्भुत संयोग

दिवाळीच्या दिवशी लागणार सूर्य ग्रहण; 27 वर्षांनंतर बनतोय अद्भुत संयोग

Subscribe

अश्विन अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल.

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दिवशीच सूर्य ग्रहण असणार आहे. यामुळे लोकांवर सूर्य ग्रहणाचे दुष्प्रभाव पडणार आहे. सूर्य ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

अश्विन अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. अशामध्ये सूर्य ग्रहण 12 तास आधी 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे.

- Advertisement -

कधी लागणार सूर्य ग्रहणाचा सुतक काळ
यावेळी लागणारे सूर्य ग्रहण आंशिक असून आणि वर्षाचे दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. सूर्य ग्रहणाचा सुतक काळ 24 ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी लागणार आहे. जे 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी सूर्य ग्रहण संपणार आहे.

यापूर्वी 1995 मध्ये म्हणजे 27 वर्षांपूर्वी असा योग तयार झाला होता. यावेळी लागणारे सूर्य ग्रहण आंशिक असणार आहे. याची सुरुवात 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी होणार असून संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांपर्यंत असणार आहे. सूर्य ग्रहणाची संपूर्ण वेळ 4 तास 3 मिनिट असेल.

- Advertisement -

सुतक काळामध्ये करु नका ‘हे’ काम

  • ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्य ग्रहणला एक अशुभ घटना मानली जाते आणि याच्या सुतक काळात शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई केली जाते.
  • ग्रहणादरम्यान जेवण करणं वर्जित असते.
  • ज्योतिष शास्त्रामध्ये असं म्हटलं जात की, ग्रहणादरम्यान, दात साफ करणं, केस विचरण्यास देखील मनाई केली जाते.
  • तसेच ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांना घराबाहेर जाण्यास मनाई केली जाते.

हेही वाचा :

बृहस्पतीच्या मार्गक्रमणाने बनणार अदभुत योग; या राशींना होणार फायदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -