घरICC WC 2023ICC Cricket World Cup : क्रिकेटच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात; इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये सलामीची लढत

ICC Cricket World Cup : क्रिकेटच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात; इंग्लंड-न्यूझीलंडमध्ये सलामीची लढत

Subscribe

ICC Cricket World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होत आहे. विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आज दुपारी 2 वाजता आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. (ICC Cricket World Cup Cricket World Cup begins today Opening match in England New Zealand)

हेही वाचा – Asian Games 2023: भारतानं रचला इतिहास; गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर

- Advertisement -

न्यूझीलंड संघ अद्याप आयसीसी विश्वचषक जिंकू शकलेला नाही. तसेच कर्णधार केन विल्यमसन सराव सामने  खेळूनही इंग्लंडसोबतचा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्याचबरोबर वेगवान अनुभवी गोलंदाज टीम साऊथीही पहिल्या सामन्यात उपलब्ध नाही. शस्त्रक्रियेनंतर दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंड संघासमोर अडचणी आहेत. याउलट अहमदाबादमधील खेळपट्टी सामान्यत: फलंदाजांना उपयुक्त ठरते आणि इंग्लंडकडे उत्कृष्ट फलंदाजांचा समावेश आहे. याशिवाय बेन स्टोक्सनेही निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुनरागमन केले आहे. गुडघ्याच्या समस्येमुळे तो गोलंदाजी करू शकणार नाही, परंतु मोठ्या सामन्यात चांगली फलंदाजी नक्कीच करेल. तसेच इंग्लंडचा संघ तरुण असून जोस बटलरच्या नेतृत्वाखाली तिसरा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

- Advertisement -

इंग्लंडला जोफ्रा आर्चरची उणीव भासणार 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, डेव्हिड मलान आणि जो रूटसारखे फलंदाजांनी भारतामध्ये आयपीएल खेळल्यामुळे त्यांना विश्वचषकात याचा फायदा होताना दिसणार आहे. तसेच मोईन अली, ख्रिस वोक्स आणि सॅम कुरनच्या रूपाने उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघात आहेत. वेगवान गोलंदाजी मार्क वुडलाही आयपीएलचा अनुभव आहे. आदिल रशीद फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या 2019 विश्वचषकातील आघाडीच्या विकेट घेणार्‍या जोफ्रा आर्चरची इंग्लंडला उणीव भासणार आहे. त्यांची राखीव म्हणून संघात निवड करण्यात आली आहे.

न्यूझीलंडसाठी कर्णधार टॉम लॅथमचा खराब फॉर्म चिंतेचा विषय 

दुसरीकडे, न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात केन विल्यमसन उणीव भासणार असली तरी सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. न्यूझीलंड संघ 2015 आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. डॅरिल मिशेल फॉर्मात आहे आणि डेव्हन कॉनवेसारखा अनुभवी फलंदाज अव्वल क्रमांकावर आहे. मात्र, कर्णधार टॉम लॅथमचा खराब फॉर्म न्यूझीलंडसाठी चिंतेचा विषय आहे. त्यांच्याकडे जिमी नीशम आणि ग्लेन फिलिप्ससारखे आक्रमक फलंदाज आहेत. विल यंगने यावर्षी एकदिवसीय 14 सामन्यांमध्ये 578 धावा केल्या असून तिसऱ्या क्रमांकावर तो खूप उपयुक्त फलंदाज ठरू शकतो. गोलंदाजीत संघाला टीम साऊथीची उणीव भासेल, पण मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन संघात आहेत.

हेही वाचा – Asian Games : शेवटी चायनीज तंत्रज्ञानच…; नीरजने फेकलेला भालाही मोजता आला नाही

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जो रूट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम कुरन, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली, गस ऍटकिन्सन.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​केन विल्यमसन (पहिल्या सामन्यात उपलब्ध नाही), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -