घरताज्या घडामोडीUPSC Head : मुंबईतील चाळीत अगरबत्ती विकणाऱ्या मनोज सोनींची UPSC चेअरमनपदी नियुक्ती

UPSC Head : मुंबईतील चाळीत अगरबत्ती विकणाऱ्या मनोज सोनींची UPSC चेअरमनपदी नियुक्ती

Subscribe

देशाच्या सर्वोच्च संस्थेपैकी एक असणाऱ्या यूपीएससीच्या चेअरमनपदी UPSC Chairman) मुंबईकराची नियुक्त करण्यात आली आहे. मुंबईच्या शीरपेचात हा एक मानाचा तुरा मानला जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईतील चाळीत अगरबत्ती विकणाऱ्या मनोज सोनी (Manoj Soni ) यांची UPSC चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी त्यांची निवड करण्यात आली आहे. मनोज सोनी हे देशात विद्यापीठाचे कुलगूरू होणारे पहिले तरुण कुलगूरू आहेत.

यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनी यांनी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःच अगरबत्तीची विक्री करुन शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मनोज सोनी पाचवीत होते. त्यांच्या वडिलांचा भुलेश्वरच्या फुटपाथावर कपडे विकण्याचा व्यवसाह होता. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटूंबाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. यामुळे कुटुंबाला हातभार आणि शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांनी भुलेश्वर परिसरात अगरबत्ती विकण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या आईने १९७८ मध्ये मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते गुजरातच्या आनंद जिल्ह्यात राहण्यासाठी गेले.

- Advertisement -

मनोज सोनी लहान वयात गुजरातमध्ये गेल्यानंतर मोगरीतल्या स्वामीनारायण पंथाच्या अनुपम मिशनशी जोडले. बारावी सायन्सच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर मनोज सोनी यांनी राज रत्ना पीटी पटेल महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. १० जानेवारी २०२० मध्ये सोनी यांना निष्कर्म कर्मयोगी दीक्षा मिळाली आहे. तरुण वयात २००५ मध्ये त्यांना एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

मनोज सोनी यांचे वडिल खूप पूर्वीपासून मुंबईतील मिशनचे सदस्य होते असे अनुपम मिशनचे साधू पीटर पटेल यांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे असे म्हटलं आहे की, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर या संस्थेने सोनींना शैक्षणिक मदत केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यास सुरुवात केली. मिशनमध्ये काम करणारे सदस्य काम करुन पैसे मिळवतात आणि मिळालेले पैसे समाजसेवा करण्यासाठी आदिवासी भागातील गरजूंना देतात. ज्यात शाळा, दवाखाने कॉलेजचा समावेश आहे.

- Advertisement -

मनोज सोनी सर्वात तरुण कुलगूरू

मनोज सोनी हे देशामधील सर्वात तरुण कुलगुरू होते. २००५ मध्ये एमएसयू वडोदरा युनिव्हर्सिटी आणि २००८ मध्ये अहमदाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगूरू होते. तसेच सोनी यांचे सायन्सवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी सरकार पटेल युनिव्हर्सिटीमध्ये १९९१ ते २०१६ दरम्यान इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मनोज सोनी यांनी संघर्ष करत यश मिळवलं आहे. त्यांचा हा प्रवास देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.


हेही वाचा : इतर भाषिक राज्यांतील लोकांनी इंग्रजीत नव्हे, तर हिंदीत बोलावे, अमित शाहांचा सल्ला 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -