घरताज्या घडामोडीआंब्याचे सेवन जास्त करताय तर सावधान!

आंब्याचे सेवन जास्त करताय तर सावधान!

Subscribe

वर्षभर वाट पाहणारे आंबा प्रेमींना उन्हाळा सुरू झाला की कधी आंबा खातो असं वाटतं. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी आंब्यासाठी तो हवाहवासा वाटतो. आपण अगदी पोटभरून आंबे खातो. आंब्यात पोषकतत्त्वे आढळत असले तरी अती प्रमाणात आंब्याचे सेवन नुकसानदायक ठरू शकते. तर आज आपण आंब्याचे गंभीर परिणाम काय असू शकतात ते जाणून घेऊयात.

त्वचेसंबंधी समस्या –

- Advertisement -

आंब्याचे अती सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढते आणि याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. अनेकदा चेहऱ्यावर मुरूम किंवा ओठ कोरडे पडतात.

मधुमेह –

- Advertisement -

आंब्यात शर्करेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांना मधुमेह असतो त्यांनी आंबे खाणे टाळावे. आंबे खाल्ल्यामुळे रक्तातील शर्करा वाढण्याची भीती असते.

पोटदुखी –

आंबे अती प्रमाणात खाल्ल्याने पचन प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे पोटासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

​लठ्ठपणा –

आंब्याचे सेवन जास्त केल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाण्यास अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुलाब –

आंबे जास्त खाल्ल्याने पचन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊन अतिसाराचा त्रास उद्भवू शकतो. आंब्याच्या रसात तूप टाकून खाल्ल्याने आंबा बाधत नाही असं देखील म्हटलं जात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -