घरलाईफस्टाईल'बनाना मफिन' रेसिपी

‘बनाना मफिन’ रेसिपी

Subscribe

'बनाना मफिन'

सध्या गणेशोत्सव असल्याने बाप्पाचा प्रसाद म्हणून केळी दिली जातात. त्यात पावसाचे दिवस असल्याने ती केळी कोणी खाण्यास देखील तयार नसते. त्यामुळे केळी पिकून जातात. मात्र, काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट रेसिपी सांगणार आहोत, ती म्हणजे ‘बनाना मफिन’ रेसिपी.

साहित्य

- Advertisement -
  • २ पिकलेली केळी
  • २ कप मैदा
  • पाव कप दूध
  • १ चमचा बेकिंग पावडर
  • १ कप पिठीसाखर
  • पाव कप लोणी किंवा तेल
  • चिमूटभर मीठ

कृती

सर्वप्रथम मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात साखर आणि लोणी चांगले फेटून घ्यावे. नंतर त्यात दूध आणि कुस्करलेली केळी घालून एकजीव करा. नंतर त्यात मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर घालून चांगले फेटा. नंतर मफिन मोल्डवर तुपाचा हात फिरवून घ्या आणि त्यात ते मिश्रण भरुन गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेल्सिअसवर २० मिनिटे बेक करा, अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही ‘बनाना मफिन’ रेसिपी तयार करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -