घरलाईफस्टाईलब्लॅक टीचे चकित करणारे फायदे

ब्लॅक टीचे चकित करणारे फायदे

Subscribe

अनेकांची सकाळची सुरुवात एका चहाच्या घोटाने होते. एक चहाचा घोट घेतल्याने अनेकांना ताजेतवाने वाटू लागते. पण, बऱ्याच जणांना चहाचे सेवन केल्याने त्रास देखील होतो. त्यामुळे बरेच जण ‘ब्लॅक टी’ घेतात. ब्लॅक टी ही आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे. चला तर जाणून घेऊया ब्लॅक टीचे आरोग्यदायी फायदे.

ताजेतवाने वाटते

- Advertisement -

काळ्या चहामध्ये असणाऱ्या विशिष्ट घटकांमुळे उत्साह वाढण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमता देखील वाढविण्यास मदत होते.

हृदयाचे आजार

- Advertisement -

नियमितपणे काळ्या चहाचे सेवनकेल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

मधुमेह

काळ्या चहाचे सेवन केल्यामुळे पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारण्यास मदत होते. काळा चहा मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो. विशेष म्हणजे काळ्या चहाचे सेवन करणाऱ्यांमध्ये मधुमेह खूपच कमी प्रमाणात आढळतो.

मुतखडा

योग्य प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो. ज्या स्त्रिया नियमित ब्लॅक टी घेतात त्यांच्यामध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता ८ टक्के कमी असते.

फुफ्फुसाचा कर्करोग

सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या फुफुस्साच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरू शकत. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल

अमेरिकेतील एका संशोधन केंद्राने केलेल्या संशोधनानुसार ब्लॅक टीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. जर ब्लॅक टीमुळे संतुलित आणि कमी चरबीयुक्त आहारासोबत घेत असल्यास, कोलेस्ट्रॉल संतुलित असण्याचे परिणाम दिसून येतात.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

एका संशोधनानुसार, ब्लॅक टी मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे, ब्लॅक टी आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतो. संशोधन हे देखील सांगते की ब्लॅक टीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवरील प्रतिकारशक्तीच्या स्थितीवर अवलंबून असतो.

हाडांची ताकद वाढवते

तज्ज्ञांच्या मते ब्लॅक टीचे सेवन केल्यास वयानुसार हाडाच्या ज्या समस्या आहे, ते ब्लॅक टीच्या सेवनाने दूर होण्यास मदत होते.

अतिसारपासून आराम

ब्लॅक टीचा वापर दाहक आतड्यांसंबंधी आजारामुळे पोट संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -