घरलाईफस्टाईलकच्चा कांदा खाण्याचे लाभदायक फायदे

कच्चा कांदा खाण्याचे लाभदायक फायदे

Subscribe

जाणून घ्या कच्च्या कांद्याचे फायदे

अन्नपदार्थामधील चव वाढवण्यासाठी कांद्याचा सर्रास वापर केला जातो. कांद्यामुळे पदार्थाला विशिष्ट चव येते. त्यामुळे कांदा नसेल तर जेवणच पूर्ण होत नाही. ज्याप्रकारे कांदा जेवणात जितका महत्त्वाचा आहे, तितकाच आरोग्यदायी देखील आहे. कच्चा कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया कच्चा कांदा खाण्याचे लाभदायक फायदे.

  • उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.
  • कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते. तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढतो.
  • कच्चा कांद्यावर लिंबू पिळून सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.
  • सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीवर कांदा रामबाण उपाय आहे.
  • कांद्याच्या रसात गुळ अथवा मध एकत्र करुन पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
  • डायबेटिसचा त्रास असेल तर आहारामध्ये कांद्याचे सलाड म्हणून सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
  • कच्चा कांद्यामध्ये मिथाइल सल्फाइड आणि अमीनो acids असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाचे रक्षण होते.
  • कांद्यामध्ये सल्फर तत्व अधिक असतात. त्यामुळे पोट, कोलोन, ब्रेस्ट, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कँन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच मूत्र संक्रमणाची समस्या नष्ट होते.
  • रोज कांद्याचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त प्रवाहित राहते.
  • कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए अधिक असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
  • कांद्याच्या रसात साखर मिक्स करुन रिकाम्या पोटी खाल्ल्यास किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
  • कांद्याच्या रसामध्ये दही, तुळशीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करुन केसांमध्ये लावल्यास केस गळण्याची समस्या कमी होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -