घरलाईफस्टाईलफायदे ‘फिटनेस स्नॅकिंग’चे !

फायदे ‘फिटनेस स्नॅकिंग’चे !

Subscribe

वेगवान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष होते. तरी देखील सध्या ‘फिटनेस स्नॅकिंग’ चा ट्रेंड पाहायला मिळतो. ‘स्नॅकिंग’ म्हणजे आहार किंवा खाणं नव्हे तर, दिवसातून जसा वेळ मिळेल तसा व्यायाम करणे म्हणजे ‘फिटनेस स्नॅकिंग’ होय.

*‘फिटनेस स्नॅकिंग’ म्हणजे थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने व्यायाम करणं याला ‘फिटनेस स्नॅकिंग’ असं म्हणतात. ‘फिटनेस स्नॅकिंग’ चे फायदे पुढील प्रमाणे –

*हवा तेवढा वेळ व्यायामास न मिळाल्याने व्यायाम करणे टाळले जाते. नियमित व्यायाम न केल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसते. स्नॅकिंगअंतर्गत जीममध्ये जाऊन दोन-तीन तास सलग व्यायाम करण्यापेक्षा काही ठराविक वेळाने व्यायाम करणे याचा समावेश यात होतो. त्यामुळे वेळेचे कोणतेही कारण न देता व्यायाम हा होतोच.

- Advertisement -

*स्नॅकिंगअंतर्गत नियमित व्यायाम होत असल्याने हृदयरोग, सांधेदुखी आणि रक्तदाब अशा आजारांपासून बचाव करता येतो.

*रोजच्या ठरलेल्या दिनचर्येमध्ये कोणताही बदल न करता, त्या वेळापत्रकात काही वेळाच्या अंतराने टप्प्यांमध्ये व्यायाम करणे शक्य होतं. एकाच वेळी सलग व्यायाम केल्याने येणारा थकवा कमी होऊन, काही वेळाच्या अंतराने केलेल्या व्यायामाने मन प्रसन्न राहण्यास मदत होते.

- Advertisement -

*पंधरा मिनिटे जोरात चालणे किंवा पायर्‍यांची चढ-उतार करण्यासारखे सोपे व्यायाम केल्याने हृदयाचे ठोके वाढण्यास मदत होते. छोट्या-छोट्या टप्प्यात करता येण्यासारखे हे व्यायाम प्रकार रोज केल्यास हृदयातील रक्तपुरवठा आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. असे व्यायाम करण्यास ठरवून वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता भासत नाही.

*उत्तम आरोग्यासाठी आठवड्याला साधारण 150 मिनिटे चांगला व्यायाम करणे अपेक्षित असते. छोट्या टप्प्यात करता येण्यासारखे हे व्यायाम प्रकार करण्यासाठी तुम्ही तुमच्या सहकार्‍यांना प्रोत्साहित करू शकता.

*तासन्तास व्यायाम करणं कंटाळवाणं वाटत असल्यास स्नॅकिंग हा उत्तम पर्याय आहे. हा पर्याय अमलात आणल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होते.

*स्नॅकिंग करताना चालण्याच्या व्यायामाबरोबरच जॉगिंग, स्कॉट्स यांसारख्या व्यायामप्रकारावरही भर द्या. योग्य ती काळजी घेऊन स्नॅकिंग केलं, तर तुम्ही आरोग्यदायी आयुष्य नक्की जगू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -