घरताज्या घडामोडीAir Pollution and covid-19: सावधान! कोरोना रिकव्हर झालेल्या रुग्णांना वायु प्रदूषणाचा धोका

Air Pollution and covid-19: सावधान! कोरोना रिकव्हर झालेल्या रुग्णांना वायु प्रदूषणाचा धोका

Subscribe

दिल्लीसह पंजाब हरियाणाच्या आसपासच्या परिसरातील हवामान खराब झाले

यंदा लोकांनी मोठ्या उत्साहात दिवाळीचे मनसोक्त फटाके फोडले आणि सोबत हवेची गुणवत्ता देखील खाली आणली. याच दिवसात थंडी सुरू झाली आहे आणि हवामानाचा दर्जा खराब झालाय आणि याचा सर्वात जास्त परिणाम हा कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांवर होत आहे.  दिल्लीसह पंजाब हरियाणाच्या आसपासच्या परिसरातील हवामान खराब झाले आहे. रिपोर्टनुसार दिल्ली एनसीआरमध्ये ५०० अधिक हवामानाचा एक्सआई नोंदवण्यात आला आहे. ही पातळी गंभीर असल्याचे म्हटले गेले आहे. हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने परिसरात चारही बाजूंना धुके पसरल्यासारखे दिसत आहे. याचा गंभीर धोका हा कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांना आहे.

- Advertisement -

ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. गंभीर कोविड रुग्णांच्या शरीरात दीर्घ काळापर्यंत कोरोनाचा प्रवाभ राहतो ज्याला पोस्ट कोविड सिंड्रोम असे म्हणातत. यात श्वसनासंबंधी समस्या, थकवा,केस गळणे ही लक्षणे दिसून आली आहेत. फुफ्फुसांसंबंधीतील आजार बरा होण्यास अधिक काळ लागू शकतो. डोळे, त्वचा आणि घश्यात खाज येणे किंवा जळण होणे, त्याचप्रमाणे हवामानाची गुणवत्ता खराब झाल्याने फुफ्फुसांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. वायु प्रदूषणामुळे संपूर्ण स्वास्थ बिघडले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम हा लोकांच्या श्वसनावर झाला असून रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते.

हवेची गुणवत्ता कमी झाल्याने कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांना जास्त सावधान राहणे गरजेचे आहे. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार,  जे लोक कोरोनातून रिकव्हर झाले आहे त्यांना श्वास घेताना त्रास होणे, श्वास फुलणे आणि ब्रोशर हायपरएक्टिव्हिटीचा त्रास होऊ शकतो.  वायुप्रदूषण ही सध्या लोकांच्या आजारी पडण्याचे मुख्य कारण झाले आहे. श्वास फुलणे आणि श्वासासंबंधी अनेक आजार सध्या वाढताना दिसत आहेत. कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांमध्ये फुफ्फुसासंबंधी आजार  बळावत आहेत त्यानंतर त्यांना पुन्हा रिकव्हर होण्यास फार वेळ लागत आहे.

- Advertisement -

मुंबईसह अनेक शहरातील हवेचा दर्जा खराब झाला आहे. दिवाळीत जितके प्रदूषण झाले नव्हते तेवढे प्रदूषण मुंबईत आता झाल्याचे म्हटले आहे.  मुंबईत कुलाबा, माझगाव,मालाड या ठिकणी ३०० एक्सूआय हवामानाची गुणवत्ता नोंदवली गेली आहे. दिवाळीत मुंबईत हवेची गुणवत्ता १६४ एक्सआय नोंदवली गेली होती तर रविवार पर्यंत हवेची गुणवत्ता २३५ एक्सआय वर गेली. प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी  बाहेर पडताना मास्क घाला,दररोज व्यायाम करा. सर्दी खोकल्यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.आपल्या आजूबाजूला स्वच्छता राखा.


हेही वाचा – कामाच्या वेळेत छोट्याश्या डुलकीने वाढते एकाग्रता, AIIMS संशोधकांचा रिसर्च

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -