घरलाईफस्टाईलकामाच्या वेळेत छोट्याश्या डुलकीने वाढते एकाग्रता, AIIMS संशोधकांचा रिसर्च

कामाच्या वेळेत छोट्याश्या डुलकीने वाढते एकाग्रता, AIIMS संशोधकांचा रिसर्च

Subscribe

दुपारच्या जेवणानंतर अनेकदा ऑफिसमध्ये काम करताना डोळ्यावर झापड येते, पेंग येऊ लागते आणि हा अनुभव सर्वांनाच येतो. कारण पुरेशी झोप झालेली नसते. अशावेळी आपण कडक चहा, कॉफी पिऊन आपण झोप, मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र कामाच्या वेळात डोळ्यावर आलेली झापड दूर न करता एक डुलकी घेतल्य़ाने आपल्या कामातील एकाग्रता अधिक वाढते असे एका संशोधनातून उघड झाले आहे. पाटणातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने यावर संशोधन केले आहे.

अनेकदा रात्री उशीरा आणि अपुरा वेळ झोपल्याने कामावर दिवसभर पेंगणं आणि डुलकी देणे जीवनशैलीचा भाग झालाय. मात्र या डुलकी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतेय. विषेशत: ड्रायव्हिंग करणाऱ्या लोकांना ही डुलगी अधिक रिफ्रेश करते असा या संशोधनातून समोर आलेय. या डुलगी येण्याला अनेक जण नॅप किंवा पावर नॅप असेही म्हणतात. त्यामुळे दिवभरातील एक नॅप तुमच्या कामातील एकाग्रता अधिक वाढत असल्याचे एम्सच्या संशोधनात म्हटलेय.

- Advertisement -

एम्सच्या (AIIMS ) या पायलट संशोधानात १८ ते २४ वयोगटापासून ते ६८ वयोगटातील स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला होता. यावेळी संशोधनात असे दिसून आले की, ज्या सहभागी लोकांनी पावर नॅप घेतली होती त्यांची झोप पूर्ण न झालेल्या लोकांच्या तुलनेत अडचणी सोडवणे आणि काम पूर्ण करण्यातील कामगिरी सर्वोत्तम होती.

या संशोधनावर एम्स-पाटणा येथील फिजिओलॉजी विभागाचे सह-लेखक आणि प्राध्यापक डॉ. कमलेश झा म्हटले की, पावर नॅप आणि रॅपिड आय मूव्हमेंट नॅपमुळे लोकांना कामात लक्ष केंद्रीत करताना अडचणी आल्या नाहीत. हे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे.

- Advertisement -

या संशोधनासाठी दोन वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. यावेळी दोन्ही गटांना सुडोकूचा खेळाचा संच देण्यात आला होता. हा खेळ तर्क-वितर्क आणि सांख्यिक आकडेमोडीचा खेळ आहे. यावेळी सहभागी लोकांना अडचणींनुसार, वेगवेगळ्या लेवलवर खेळ खेळण्यास देण्यात आला. प्रत्येक गटातील सहभागीं लोकांना या खेळासाठी प्रत्येक लेवलवर १० ते १२ मिनिटे देण्यात आली. जेव्हा एखाद्या गटातील सर्वाधिक लोक खेळादरम्यान कोणत्या लेवलवर अडकले, तेव्हा त्या गटातील लोकांना डुलकी घेण्याची परवानगी देण्यात आली, तर दुसऱ्या गटाला जागे राहण्यास सांगण्यात आले.

यावेळी एका तासंची डुलकी घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा अपुर्ण राहिलेला सुडोकू खेळाचा संच त्यांना पुन्हा देण्यात आला. त्यानंतर या लोकांना तो संच पूर्ण करता आला की नाही हे तपासण्यात आले. यावेळी जागे राहिलेल्या ३७ सहभागी लोकांपैकी फक्त ६ जणांना सुडोकू संच सोडवता आला. तर ३१ जणांना ते शक्य झाले नाही. तर एक तास डुलकी घेतल्या सहभागी ३१ लोकांपैकी १६ जणांना तो सुडोकू संच सोडवता आला तर १५ जण ते पूर्ण करु शकले नाही.

यामुळे झोप पूर्ण करणारे १६ पैकी १३ सहभागी लोकं यशस्वीरित्या काम पूर्ण करू शकले, तर पाच जण करू शकले नाहीत. यात जागे राहिलेल्यांची आणि झोप पूर्ण झालेल्याशी तुलना केली असता १३ लोकं सुडोकू यशस्वीपणे पूर्ण करू शकले तर १२ ते करू शकले नाहीत.

अभ्यासाचे वर्णन करताना, डॉ. झा म्हणाले, ” सामान्यतः पॉवर नॅप किंवा डुलगी घेणे अनेकदा चांगले वाटत नाही. खास करुन कामाच्या ठिकाणी ते मान्य नसते. परंतु या अभ्यासातून डुलकी घेणं हे काम उत्तम करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध केले आहे. परंतु यातून असे सांगायचे आहे की, आहार व्यायाम आणि रात्रीची आठ तास झोप हे नियमित आणि निरायम आरोग्याचे सूत्र आहे, परंतु दुपारची डुलगी घ्यायची असल्यास ती तीस मिनिटे घ्या आणि नियमितपणे घ्या. उगाच रात्राची जागरणाती भरपाई म्हणून डुलकी घेणं टाळा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -