घरदेश-विदेशLive Update: कांजुरमार्गमधील हेवी इंडस्ट्रियलमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

Live Update: कांजुरमार्गमधील हेवी इंडस्ट्रियलमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

Subscribe

कांजूरमार्ग येथील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर मिळवण्याचे प्रयत्न सुरू


राज्यात गेल्या २४ तासांत ६८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहेत. तर आज दिवसभारत ९१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख २४ हजार ९८६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४० हजार ६०२ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख ६८ हजार ७९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ११ हजार ९४३ रुग्ण राज्यात सक्रीय आहेत.

- Advertisement -

अमरावतीमधील दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्यांचा जामीन कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांचा देखील समावेश आहे. सविस्तर वाचा 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

उच्च न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य- अनिल परब


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ईडी ची कोठडी संपली असता त्यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशमुख यांचे वकील आज न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असून या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे


एसटी कर्मचाऱ्यांच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार, शासकीय इतमामात होणार अत्यंसंस्कार


हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार, अधिवेशनाची नवी तारीख लवकरचं निश्चित होणार


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे घेतले अंतिम दर्शन


गुजरातमध्ये ६०० कोटींचे हेरॉईन ड्रग्ज जप्त झाले आहे. मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावामध्ये एटीएसने कारवाई करत हे ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक झाली आहे.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल


शिवरायांचे चरित्र त्यांनी लोकांसमोर ठेवले- शरद पवार


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर सकाळी १०.३० वा. वैकुंठा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पुण्यातील पुरंदरे वाड्यात येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सोमवारी अर्थात आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत केंद्रीय व्यावसायिक वातावरण तयार करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल. अर्थ मंत्रालयाने एक ट्विट केले आहे, ज्यात म्हटले आहे की, 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या  बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड देखील सहभागी होतील. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच पुण्यात निधन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -