घरलाईफस्टाईलCucumber benefits: वजन कमी होण्यासाठी काकडी आहे गुणकारी; जाणून घ्या...

Cucumber benefits: वजन कमी होण्यासाठी काकडी आहे गुणकारी; जाणून घ्या फायदे

Subscribe

कडक उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्ली जाते. काकडी खल्लाने आरोग्याला खूप फायदे होतात. जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक काकडीत असतात

Summer Diet Tips : उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी खूप उपाय करत असतो. त्यामुळे आपण आहारात फळांचा समावेश करतो. यामुळे आपले वजन वाढू शकते. शरीराला हायड्रेटेड (Hydrated) ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी खूप फायदेशीर आहे. कडक उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्ली जाते. काकडी खल्लाने आरोग्याला खूप फायदे होतात. जीवनसत्त्वे ए, सी, के, पोटॅशियम, ल्युटीन, फायबर असे अनेक पोषक घटक काकडीत असतात. काकडी खल्लाने वजन कमी होण्यास मदत होते. तर चला जाणून घेऊ या काकडी खाण्याचे फायदे.

1. काकडी नियमित खल्लाने केसाची वाढ आणि त्वचा चमकदार होते. काकडीही त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच काकडीचा रस (Cucumber juice) प्यायल्याने त्वचेवरील डाग जाण्यास मदत होते.

- Advertisement -

2. काकडीमध्ये व्हिटामिन के (Vitamin K) खूप प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. काकडी खल्लाने हाडांची घनताही वाढते.

3. काकडीमध्ये जास्त कॅलरी (Calories) असतात. काकडीमध्ये वजन वाढवणारे घटकही नसल्याने काकडी खल्ल्याने वजनही वाढत नाही. यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते. काकडी खल्लाने पोटही भरलेले राहते. आणि दुसरा काही खावेसे वाटत नाही.

- Advertisement -

4.काकडीमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे पोटॅशियमसह शरीरातील एँसिड आणि मूत्रपिंडातील (Acid and kidney) अशुद्धता काढून टाकते.

5. काकडी खाल्लाने कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol levels) संतुलित राहते. त्यामध्ये एक घटक आहे त्याला स्टेरॉल (Sterol) म्हणतात. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीचे संतुलन राखता येते.

6. काकडीमध्ये भरपूर पोटॅशियम (Potassium) असल्याने रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -