घरलाईफस्टाईलशिजवलेल्या भाताचे स्वादिष्ट कटलेट; आजच ट्राय करा

शिजवलेल्या भाताचे स्वादिष्ट कटलेट; आजच ट्राय करा

Subscribe

बऱ्याच वेळा रात्रीचा भात उरतो अशावेळी त्या भाताचे आपण चविष्ट कटलेट बनवू शकतो.

शिजवलेल्या भाताचे स्वादिष्ट कटलेट

बऱ्याच वेळा रात्रीचा भात उरतो, अशावेळी त्या भाताचे आपण चविष्ट कटलेट बनवू शकतो. जे खायला चवदार असतात आणि मुलांना देखील आवडतात. चला तर मग साहित्य आणि रेसिपी जाणून घेऊ या.

- Advertisement -

साहित्य : १ कप शिजवलेला भात, १ कप चिरलेलं गाजर, १ कप चिरलेली फरसबी, १ कप चिरलेली ढोबळी मिरची,
१ कप कांद्याची पात, १ छोटा चमचा लसूण, १ लहान हिरवी मिरची, २ मोठे चमचे कोथिंबीर, ३ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर, २ मोठे चमचे पांढरे तीळ, १/२ लहान चमचा काळीमिरपूड, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल.

- Advertisement -

 

कृती : सगळ्यात आधी एका कढईत तेल घालून लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या. त्यानंतर सर्व चिरलेल्या भाज्या कढईत परतून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळीमिरपूड घाला. त्यानंतर हे सर्व मिश्रण शिजवून घ्या आणि गॅस बंद करून सर्व थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात शिजवलेला भात, कॉर्नफ्लॉवर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून मिसळून घ्या. त्यानंतर त्याला कटलेटचा आकार द्या. कटलेट १५-२० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजमधून काढून घ्या. त्यानंतर कढईत तेल तापत ठेवा. हे कटलेट गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तयार कटलेट सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.


हेही वाचा : मूग डाळीचे चविष्ट कबाब; आजच ट्राय करा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -