घरलाईफस्टाईलकानातल्यांमधील हटके स्टाईल

कानातल्यांमधील हटके स्टाईल

Subscribe

सध्याच्या फॅशनमध्ये टिकून राहायचे असल्यास भन्नाट स्टाइल या केल्याच पाहिजे. कपड्यांमध्ये विविधता आणून आपण स्टाईलिश राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मार्केटमध्ये उठून दिसण्यासाठी जरा हटके स्टाईल करणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कपड्यांची फॅशन करताना एक्सेसरीजकडे देखील लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असते. एखादा ड्रेस किंवा कुर्ता देखील घातला का सर्वप्रथम लक्ष जाते ते कानातल्यांकडे. त्यामुळे फॅशनेबल कपड्यांसोबत कानातील देखील फॅशनेबल घालणे तितकेच महत्तवाचे असते. चला तर जाणून घेऊया असे काही फॅन्सी कानातील.

स्टेटमेंट ईयररिंग

- Advertisement -

सामान्य कानातल्यापेक्षा जरा हटके असे हे ईयररिंग असतात. हे सामान्य ईयररिंगपेक्षा थोडे मोठे आणि आकर्षित करणारे असतात. स्टेटमेंट ईयररिंगमध्ये झूमर स्टाइलचे ईयररिंग कॉमन आहेत. या ईयर रिंगरंगांमध्ये विविधता आढळून येते. मात्र यातील कॉन्ट्रास्ट या ईयररिंगला अधिक पसंती आहे. हे कानातील फंक्शन आणि पार्टीमध्ये अधिक प्रमाणात परिधान केले जातात.

दोर्‍याचे ईयररिंग

- Advertisement -

सध्या मार्केटमध्ये दोर्‍याच्या ईयररिंगसची चलती आहे. हे कानातले कॅजुअल्स कपड्यांवर सुंदर दिसतात. या कानातल्यांमध्ये विविध व्हरायटी असून यामध्ये विविध रंगाचे कानातील बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये टॉप्स, झुमके मार्केटमध्ये उपलब्ध असून झुमक्याला अधिक मागणी आहे.

स्टॉन ईयररिंग

ड्रेस, जिन्स आणि टॉप्सवर स्टॉन ईयररिंग अधिक आकर्षित दिसतात. यामध्ये व्हारायटी असून हे कानातील अधिक उठून दिसण्यास मदत होते. एखादा काळ्या रंगाचा ड्रेस असल्यास त्यावर गोल्डन किंवा सिल्व्हरचे स्टॉन ईयररिंगमुळे लूक भन्नाट दिसतो.

ट्रेडिशनल ईयररिंग

ट्रेडिशनल कपड्यांवर ट्रेडिशनल इयररिंग घातल्यास चेहरा खुलून दिसण्यास मदत होते. ट्रेडिशनल ईयररिंग लग्न सोहळ्यात साडी किंना अनारकली सारख्या ड्रेसवर उठून दिसण्यास मदत होते. या ट्रेडिशनल ईयररिंगमध्ये गोल्डच्या ईयररिंगमध्ये अनेक व्हरायटी असतात. ट्रेडिशनल ईयररिंगमध्ये झुमके परिधान केल्यास एक पारंपारिक लूक येतो.

रिंग ईयररिंग

कानातल्यामध्ये कॉमन पण आकर्षित करणारे कानातले म्हणजे रिंग. रिंगमध्ये गोल्ड आणि सिल्वर या दोन प्रकारचे आढळून येतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण रिंग ईयररिंगचा वापर करतात. यामध्ये स्टॉन असल्याचे ते कानातले अधिकच आकर्षित करतात.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -