घरगणेशोत्सव 2022ऋषीपंचमीला का केली जाते ऋषीची भाजी? जाणून घ्या

ऋषीपंचमीला का केली जाते ऋषीची भाजी? जाणून घ्या

Subscribe

ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते.

उद्या आपल्या सर्वांच्याच घरी गणरायाचं आगमन होणार आहे. गणेश चर्तुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं. ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व असतं. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषिपंचमी म्हणतात. यादिवशी ऋषिंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते.

हे ही वाचा – गणेशोत्सव 2022 : मोदकम् समर्पयामि… बाप्पासाठी घरच्या घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक

- Advertisement -

ऋषीची भाजी का केली जाते?

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. यादिवशी महिलांनी धान्य खायचं नसतं. शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धन्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाहीत. अशी प्रथा आहे. म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. या सर्व भाज्या शहरांमध्येही उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला गेहून येतात.

- Advertisement -

हे ही वाचा –  हरतालिका 2022 : हरतालिका व्रतामागे काय आहे पौराणिक कथा? कसे करावे व्रत आणि पूजा

ऋषीच्या भाजीसाठी नेमक्या कोणत्या भाज्या वापरल्या जातात?

ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनविली जाते. या दिवशी ठरावीक पालेभाज्या, भोपाळ, भेंडी, गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनविली जाते. त्यात लाल भोपळा,पडवळ या फळभाज्यांचा तर अळू, लाल माठ, टोकेरी माठ या पालेभाज्यांचा वापर केला जातो. त्याच बरोबर अंबाडी सुद्धा घातली जाते.

हे ही वाचा – गणेशोत्सव 2022: पारंपरिक दागिन्यांनी खुलवा बाप्पाचं गोजिरवाणं रूप

अळूची पानं, लाल देठं, रताळं, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. यात मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या घातलया जातात. गणेशोत्सवा दरम्यान पावसाळा असतो आणि पावसाळ्यात अनेक पालेभाज्या सहज उपलुब्ध असतात त्या भाज्यांचा वापर सुद्धा ऋषीपंचमीच्या भाजी मध्ये केला जातो. कोकणात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ऋषी पंचमीच्या या भाजीचे सुद्धा विशेष महत्व आहे.

हे ही वाचा –  यंदाचा गणेशोत्सव करा संगीतमय; आवर्जून ऐका ‘या’ गणेशस्तुती

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -