घरभक्तीहरतालिका 2022 : हरतालिका व्रतामागे काय आहे पौराणिक कथा? कसे करावे व्रत...

हरतालिका 2022 : हरतालिका व्रतामागे काय आहे पौराणिक कथा? कसे करावे व्रत आणि पूजा

Subscribe

यंदा 30 ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया असणार आहे. हरतालिकाच्या व्रता दिवशी देवी पार्वतीसोबत गणपती, भगवान शंकर, कार्तिकेय स्वामी यांची देखील पूजा केली जाते.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य, दीर्घायुष्य, सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात, तर कुमारीका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. यंदा 30 ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया असणार आहे. हरतालिकाच्या व्रता दिवशी देवी पार्वतीसोबत गणपती, भगवान शंकर, कार्तिकेय स्वामी यांची देखील पूजा केली जाते.

हरतालिका व्रताची पौराणिक कथा

- Advertisement -

प्राचीन काळात देवी पार्वतीने भगवान शंकर पती व्हावे म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते. पार्वती यांनी केलेले व्रत आणि तप यांच्या प्रभावामुळे भगवान शंकत प्रसन्न झाले. यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिला देवी पार्वतीच्या कथा ऐकतात. कथेत देवी पार्वतीचा त्याग, संयम, धैर्य आणि पतिव्रता याचा महिमा सांगितला आहे. ही कथा ऐकल्यानंतर महिलांचे पुण्य, मनोबल वाढवते आणि त्यांच्या समस्या दूर होतात.

प्रजापती दक्षाची कन्या सतीने भगवान शंकराच्या अपमानाने दुःखी होऊन तिच्या वडिलांच्या यज्ञकुंडात उडी मारली आणि प्राण त्याग केला. त्यानंतर देवीने मैना आणि हिमावानची मुलगीच्या रुपात अवतार घेतला. देवी पार्वतीने भगवान शंकर पती होण्यासाठी व्रत करून कठोर तप केला. यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वती यांना पत्नी म्हणू स्वीकारण्याचे वरदान दिले. त्यानंतर हिमावान आणि मैना यांनी शंकर-पार्वती यांचे लग्न लावून दिले.

- Advertisement -

हरतालिका व्रत कसे कराल?


या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुभ्र कपडे परिधान करावे, त्यानंतर घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर हरतालिका देवीची मूर्तीची पूजा करावी, शिवपिंडीची देखील पूजा करावी. तसेच हरितालिका कथेचे पठण करावे आणि गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।। या मंत्राचा जप करा. या दिवशी हे व्रत फळं खाऊन करावे. हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावे. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर महिला अन्न आणि पाणी घेतात.

 


हेही वाचा :Ganesh Chaturthi 2022 : घराच्या ‘या’ दिशेला ठेवा बाप्पाची मूर्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -