घरलाईफस्टाईलमान काळी असल्यास करा घरगुती उपाय

मान काळी असल्यास करा घरगुती उपाय

Subscribe

मानेवरील काळे डाग दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

बऱ्याचदा मान काळी असल्यामुळे सौंदर्यामध्ये बाधा येते. ही मान अनेक वेळा उन्हाने, खोटे दागिने घातल्याने काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसत असल्याने चिंता वाटते, तेव्हा यावर काही घरगुती उपाय केले, तर ही समस्या सोडवता येऊ शकेल.

बेकिंग सोडा

एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात अर्था चमचा दही मिसळून पेस्ट तयार करा. दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्याने त्वचा उजळण्यात मदत मिळते. दह्याऐवजी पाणीही वापरू शकता. तसेच बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र, मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये.

- Advertisement -

बटाटा

मान काळी असल्यास बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने मानेवर चोळावा. यामुळे मानेचा काळेपणा दूर होतो.

- Advertisement -

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात. त्यामुळे बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल. मात्र, मानेवर किंवा त्याच्या जवळपासच्या त्वचेवर जखम असल्यास बेकिंग सोडा लावू नये.

गुलाब पाणी

गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेत जीवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा १५ मिनीटांसाठी गुलाबपाणी टाकून हा कापसाने मान पुसून घेतल्यामुळे त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

टोमॅटो

एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण मानेला लावावे. हे मिश्रण १० मिनीटे ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -