घरलाईफस्टाईलयासाठी खातात पाडव्याला कडूलिंबाची पानं

यासाठी खातात पाडव्याला कडूलिंबाची पानं

Subscribe

गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाची पाने खाल्ले जातात. आरोग्याच्या अनेक समस्येवर फायदेशीर ठरणाऱ्या कडूलिंबाचे फायदे जाणून घ्या

मराठी हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा हा सण. गुडीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना त्याला साखरेच्या माळेसह कडूलिंबाची पाने लावली जातात. याच दिवशी पुरण किंवा साखर-गुळासोबत कडूलिंबाची पाने खाल्ली जातात. आपले सण-उत्सव आणि परंपरा आरोग्यदायी संदेश देत असतात. याच कडूलिंबाचे नेमके कोणते फायदे आहेत जाणून घेऊया..

  • कडूलिंबाची काही पाने सुकवून वाटून त्याची पावडर बनवून त्यात चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिक्स करून फंगल इंफेक्शन झाल्यास फायद्याचे ठरते.
  • एक ग्लास पाण्यात ३ कडूलिंबाची पाने टाकून पाणी उकळून त्यात चमचाभर मध घाला आणि त्या पाण्याने गुळण्या    केल्यास घसादुखी दूर होईल.
  • गरम पाण्यात कडूलिंबाची पाने ३० मिनिटे ठेवून त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराची दुर्गंधी आणि इंफेक्शन दूर होण्यास मदत होईल.
  • मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक परिणामकारक आणि नैसर्गिक उपाय म्हणजे कडूलिंब. उत्तम परिणामांसाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा कडूलिंबाचा रस प्यायल्याने फायदेशीर ठरते.
  • कडूलिंबाची काही पाने वाटून त्याची पेस्ट बनवून ती खोबरेल तेलात मिक्स करा. केसांना हे तेल लावून १५-२० मिनिटांनी केस स्वच्छ धुतल्याने कोंडा कमी होऊन केसगळतीही दूर होण्यास मदत होईल.
  • कडूलिंबाची पानं बारीक करून दही आणि मुल्तानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरी डाग काही दिवसांतच नाहीसे होतात.
  • जर आपल्याला पोटाच्या समस्या असतील, पोट साफ होत नसेल तर निंबोणी खावी, पोट साफ होईल. रक्त स्वच्छ होईल आणि भूकही चांगली लागेल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -