Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई जरी प्रकृतीसाठी गरम असली तरीही गारव्यामध्ये पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. जाणून घेऊया पपई आरोग्यसाठी कशी लाभदायक आहे.

Related Story

- Advertisement -

पपई हे फळ बारा महिने उपलब्ध असतं. आजकाल बाहेरदेखील फेरीवाले पपई आणि कलिंगड विकताना दिसतात. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. पपई जरी प्रकृतीसाठी उष्ण असली तरीही गारव्यामध्ये पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. जाणून घेऊया पपई आरोग्यसाठी कशी लाभदायक आहे.

१. वजन घटण्यासाठी उपयुक्त – मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असतात. पपईमध्ये असणाऱ्या फायबर्समुळं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळं भूक लागल्यानंतर पपई खाल्ल्यास पोटही भरतं आणि वजन न वाढण्यासाठी फायदेशीर ठरतं.

- Advertisement -

२. मधुमेह असणाऱ्यांसाठी गुणकारी – पपई गोड असूनही खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढत नाही. त्यामुळं मधुमेही असणाऱ्यांनी पपई खाल्ल्यास कोणताही धोका नसतो. आधीपासून पपई खात असल्यास, मधुमेह न होण्यास मदत होते.

३. कोलेस्ट्रॉल कमी होते – आजकाल प्रमाण बऱ्याच लोकांच्या शरीरात वाढलेलं ऐकू येतं. मात्र पपईमध्ये व्हिटामिन सी आणि फायबर असल्यामुळं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साठून राहत नाही.

- Advertisement -

४. मासिक पाळीचा त्रास कमी जाणवतो – पपई प्रकृतीसाठी उष्ण असते. अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रियांनी पपई खाल्ल्यामुळं मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. पोटदुखीदेखील कमी होते.

५. कर्करोगापासून बचाव – पपईमधील अॅन्टीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकलपासून बचाव करण्यास कारणीभूत ठरते. शिवाय बीटा – केरोटीनमुळं आतड्यांच्या कर्करोगांपासून पपई बचाव करते.

- Advertisement -