घरलाईफस्टाईलतुम्हाला सतत थकवा आणि झोप येतेयं? मग शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता

तुम्हाला सतत थकवा आणि झोप येतेयं? मग शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता

Subscribe

शरीरात 'व्हिटॅमिन D' ची आवश्यकता का बसते?

बऱ्याचदा काम करत असताना दिवसभर सुस्ती जाणवते. कामात मन लागत नाही. पण याकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. परंतु सतत येणारा थकवा आणि झोप या मागे नेमके काय कारण आहे याची माहिती जाणून महत्त्वाचे आहे. कारण असे होण्यामागचे कारण आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण यावर उपाय करु शकत नाही. मुख्य म्हणजे शरीर ताजेतवाणे आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीरास पोषक घटकांची गरज असते. या व्हिटॅमिन डी हा देखील शरीरास महत्त्वपूर्ण पोषक घटक आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो. म्हणूनच त्याला सनशाईन व्हिटॅमिन देखील म्हटले जाते.

जेव्हा आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा शरीर व्हिटॅमिन डीला प्रतिसाद देते. परंतु असे काही पदार्थ आहेत ज्यात व्हिटॅमिन डीचे सर्वाधिक प्रमाण आढळते. उदा. तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दूधाचा वापर करायला हवा. प्रथिनांचा वापर करायला हवा. चीज, मासे, दही, योगर्ट शेंगदाण्याचा वापर आहारात करा. फास्ट फूड पचनासाठी जड असतं. ते खाणं टाळा. वेळेवर आहार घ्या.

- Advertisement -

शरीरात ‘व्हिटॅमिन D’ ची आवश्यकता का बसते?

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडे मजबूत करण्याबरोबरचं कॅल्शियम शोषण्यास मदत करते. जर शरीरात व्हिटॅमिन डी शरीरात योग्यरित्या शोषले गेले नाही तर हाडांसंबंधीत आजार वाढतात. यामुळे शरीरात वेदना होणे, आळशीपणा आणि थकवा अशी लक्षणे दिसतात.

काय आहेत लक्षणे ?

१) आजारी पडणे

जर तुम्ही सतत आजारी पडत असाल आणि वर्षभर खोकला आणि सर्दी होत असे तर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. तर संशोधनात असेही दिसून आले की, व्हिटॅमिन डीची कमतरतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी पडते आणि तो व्यक्ती सतत आजारी पडतो.

- Advertisement -

२) थकवा येणे

काही महिलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वर्षाचे १२ महिने थकवा जाणवत असल्याच्या तक्रारी करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही व्हिटॅमिन डीयुक्त गोष्टींचा आहारात समावेश करा, जेणेकरून तुम्ही शरीरात कमी पडणाऱ्या जीवनसत्त्वाची कमी दूर करत तंदुरुस्त राहू शकतात.

३) शरीरात वेदना जाणवणे

व्हिटॅमिन डी शरीराची हाडे निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु शरीरात जेव्हा व्हिटॅमिन डी कमी होऊ लागतात. तेव्हा पाठदुखी, सांधेदुखीसारखी लक्षणे दिसू लागतात.

४) नैराश्य येणे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या लक्षणांपैकी एक म्हणजे नैराश्य. जे लोक दिवसभर घरी बसून काम करतात त्यापेक्षा घराबाहेर काम करणार्‍यांमध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असते. अशा परिस्थितीत दिवसभरातील काही वेळ उन्हात उभे राहून व्हिटॅमिन डी घ्या.

५) केस गळणे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केसांची गती लवकर होऊ शकते. अशा परिस्थितीत खाण्याकडे लक्ष द्या आणि तणावापासून दूर रहा. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तणाव आणि नैराश्यामुळे केसांच्या वाढीवर आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.


Covid Variant : भारतात कोरोना विषाणूचा एक नवा व्हेरियंट बनतोय चिंतेचे कारण- WHO


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -