घरलाईफस्टाईल'उसाचा रस' कावीळसह इतर समस्यांवर रामबाण उपाय

‘उसाचा रस’ कावीळसह इतर समस्यांवर रामबाण उपाय

Subscribe

उसाच्या रसाचे फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात जागोजागी उसाच्या रसवंत्या दिसू लागतात. उन्हाळ्यात थंडावा देणारे एकमेव असं हे उत्तम पेय आहे. मात्र, हे पेय केवळ थंडावाच देत नाही. तर काही समस्यांवर देखील एक उत्तम उपाय आहे. चाल तर जाणून घेऊया उसाच्या रसाचे फायदे.

त्वचेसाठी उत्तम उपाय

- Advertisement -

अल्फा हायड्रोक्सी अॅसिड आणि ग्लायकोलिक अॅसिडचे प्रमाण असल्याने उसाचा रस त्वचेसाठी उत्तम आहे. यामुळे पिंपल्सची समस्या नाहीशी होते. त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात.

तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता

- Advertisement -

उसाच्या रसामध्ये अॅटिबॅक्टेरिअलचे प्रमाण असल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळते. दातांना इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि दात निरोगी राहतात.

थकवा दूर होतो

ऊसाच्या रसात ग्लुकोजचे प्रमाण अधिक असते. ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्समुळे हे एक उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. यामुळे ऊर्जा मिळते आणि ऊन लागण्यापासूनही बचाव होतो.

कावीळसाठी फायदेशीर

उसाचा रस कावीळसाठी गुणकारी आहे. कावीळ झाल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरा होतो.

मासिक पाळी

बऱ्याचदा मासिक पाळी येत नसल्यास सकाळ – संध्याकाळ उसाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे मासिक पाळी येण्यास मदत होते.

किडनीसाठी उत्तम

उसाचा रस खोकला, दमा, मूत्ररोग तसेच किडनीशी संबंधित रोगांवर रामबाण उपाय आहे. तसेच, उसाच्या रसामुळे यकृताचे कार्य सुधारण्यासही मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -