पावसाळ्यात केसांसाठी उपयुक्त हेअर पॅक

पावसात केसांच्या निर्माण होणाऱ्या समस्येकरिता उपयुक्त बदाम आणि अंड्याचा हेअर पॅक

सध्या पावसाचा हंगाम सुरू असल्याने बऱ्याचदा कोणत्या न कोणत्या कारणाने घराबाहेर पडावे लागते. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी पावसाच्या पाण्याता केस आणि त्वचेवर परिणाम होतो. पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा परिणाम केसांवर होतो. डोक्यात खाज येणे, कोंडा होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

पावसाळ्यात केसांना तेल लावल्याने केस अधिक चिकटपणा येतो, पंरतू केसांच्या अनेक समस्यांसाठी खोबरेल तेलासह बदामाचे तेलही फायद्याचे ठरते. पावसात केसांच्या निर्माण होणाऱ्या समस्येकरिता बदाम आणि अंड्याचा हेअर पॅक वापरणे अधिक उपयुक्त ठरते.

असा तयार करा हेअर पॅक

  • साधरण पाव वाटी बदाम तेल घेऊन त्यात एक कच्च अंड घालून हे मिश्रण योग्य प्रकारे एकत्र करून घ्या.
  • अंड आणि तेलाचे मिश्रण एकजीव झाल्यानंतर हे पॅक केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत लावा.
  • ४० मिनिटांनंतर शॅम्पू वापरून केस धुतल्यानंतर कंडीशनरचा वापरही करा.
  • आठवड्यातून एकदा तुम्ही हे हेअर पॅक वापरू शकता.

हे हेअर पॅक वापरल्याने केसांना पोषण मिळतं तसेच केसांसाठी हे नैसर्गिक कंडीशनर म्हणून देखील काम करतं तसेच अंड्यामध्ये असलेल्या प्रोटिन्समुळे केसांचा रुक्षपणा दूर होऊन केस मजबूत होण्यास फायदा होतो.